हिमायतनगर शहरातील मुस्लिम युवकांनी केले एका हिंदू व्यक्तीचे अंतिमसंस्कार
हिमायतनगर शहरातील मुस्लिम युवकांनी केले एका हिंदू व्यक्तीचे अंतिमसंस्कार
प्रतिनिधि :- सय्यद अजीम। कोरोनाच्या साथीने असा गोंधळ उडाला आहे की आपल्या रक्ताचे नाते पण दूर होत असल्याने दिसत आहे कोरोनाने असे दिवस दर्शविले आहेत कि जिथे कठीण परिस्थितीत कोणीही कोणालाही मदत करत नाही, परंतु केवळ दूर राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु या अंतरांच्या दरम्यान काही लोक असे आहेत जे केवळ धर्माचे सर्व बंधन सोडुन मानवतेवर विश्वास ठेवतात अशा जातीय सलोख्याचे आणि बंधुतेचे उदाहरण पाहिले गेले आहे.
हिमायतनगर येथे काही मुस्लिम तरुणांनी कोविडच्या मृत्यूनंतर हिंदू कर्मकांडात एका व्यक्ती चा अंत्यसंस्कार केले
हिमायतनगर शहरातील काल दिनांक 24/04/2021 रोजी हिमायतनगर शहरात एका परतिष्ठित कापड दुकानदार हिंदू व्यक्ती चा कोरोनाने निधन झाले होते,
सध्या कोरोना महामारी ने सम्पूर्ण देशात थैमान घातले असून, अश्या परिस्थतीत कोरोना बाधित व्यक्तीस लोक सावधगिरी घेत आहे,
कोरोना बाधिताचा मृत्यूनंतर कोणीही पुढेयायला तयार नाहीत, स्वतःचे नातेवाईक सुद्धा कोरोना बाधित व्यक्ती पासून दुरावा निर्माण करीत आहे,
व अंतिम संस्कारासाठी कोणीही समोर येत नाही, अश्या परिस्थतीत हिमायतनगर शहरातील मुस्लिम कोरोना योद्धा सय्यद अखिल सय्यद जलील, शेख नादार, सय्यद सादिख, व त्यांचे साथीदार हे समोर येऊन हिंदू धर्माचा सर्व रीती रिवाजा प्रमाणे हिमायतनगर शहरात एका कोरोना बाधित मयत व्यक्ती चा अंतिमसंसकार केले,
त्यामुळे हिमायतनगर शहरात त्यांचे कौतुक होत आहे। सय्यद अखिल म्हणाले की, लोक हिंदू-मुस्लीमच्या नावावर स्वतःच्या स्वार्थासाठी लढा देत आहेत. येथे आम्ही मुस्लिमांच्या स्मशानभूमीत हिंदूंच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करीत आहोत. मानवता हा आमच्यापेक्षा जातीपेक्षा महत्त्वाचा धर्म आहे.

Comments
Post a Comment