हिमायतनगर शहरात वाळू तस्करी जोमात तर तहसील प्रशासन कोमात
हिमायतनगर शहरात वाळू तस्करी जोरात वाळू तस्कऱ्यांना अभय
हिमायतनगर तहसील प्रशासन मात्र झोपेत
हिमायतनगर शहरात वाळू तस्करी जोरात सुरु असून,तहसील प्रशासन मात्र झोपेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हिमायतनगर शहरात बाजार चौक सिरंजनी रस्त्याने रात्र दिवस 24 तास वाळू तस्करी चालू असून,
वाळू तस्करांची दादागिरी हि वाढली असल्याचे दिसत आहे,
कारण सिरंजनी रोड ते बाजार चौक परिसरातून जात असताना वाळू तस्कर हे आपले ट्रेकटर जोरात धावत नेत असून, लोकांच्या लेकरे बाळानां रस्त्यावर ये जा करिता त्रास होत असून, लहान लेकरे मुलांनाचा जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
एकूण 24 तास रात्री बे रात्री ट्रॅक्टर ने वाळू नेत असल्यामुळे ट्रेकटर जोरात धावत नेत असल्याने लोकांची झोप उडाली आहे ट्रॅक्टर हळू चालवा असे सांगितल्यास दादागिरी करीत असल्याने बाजार चौक कालिका गल्ली परिसरातील लोकानां संताप आला आहे,
पण तहसील प्रशासनाचे अभय असल्यानेच हे दिवस रात्र 24 तास वाळू तस्करी करीत आहे असे समजते
वाळू तस्करी करण्याचा बाजार चौक मोहन सिंह ठाकूर यांचे घरा समोरून ते सिरंजनी रस्त्यास चोर रस्ता असा म्हणावा लागेल। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत निश्चित धोरण ठरवलं जात नाही. राज्यात कधी वैध तर कधी अवैध वाळू उपसा केल्याने नदीपात्राचं त्याचप्रमाणे पर्यावरणाचं अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, तरी देखील वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होतच आहे. कारण अवैध वाहतूक होत असल्याने महसूल आणि पोलिस प्रशासन यांच्यासोबत काही लोक हातमिळवणी करून अशाप्रकारची अवैध वाहतूक करतात.
आणि त्यामुळे दुर्घटना घडतात, रस्त्याची चाळणी झालेली दिसून येते. तसेच पर्यावरणाला प्रचंड प्रमाणात धोका निर्माण होत आहे. तसेच वाळू उपसा प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे त्या विभागातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे प्रशासनाने हा अवैध वाळू उपसा पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रतिबंध घालणे अत्यंत गरजेचं आहे

Comments
Post a Comment