अंबुलगा रस्त्यावर लेंडी प्रकल्पाच्या कॅनल वर पूल बांधून बेकायदेशीर पणे कालवा काढण्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर कारवाई करा
अंबुलगा रस्त्यावर लेंडी प्रकल्पाच्या कॅनल वर पूल बांधून बेकायदेशीर पणे कालवा काढण्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर कारवाई करा
अन्यथा आत्मदहन करणार शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
मुखेड / प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बु ) येथील शेतकरी कै.गंगाधर भीमराव कोमवाड यांच्या नावे अंबुलगा बु) येथे गट क्रमांक २१७ मध्ये १.६९ आर एवढी जमीन आहे.या जमिनीच्या वरच्या बाजूला अंबुलगा इटग्याळ रस्त्यावर लेडी प्रकल्पाच्या कँनलचे काम चालू असून त्या कॅनल वर पूल बांधुन बेकायदेशीर कालवा काढण्यात आले.त्या कालव्याचे पाणी गंगाधर कोमवाड यांच्या शेताच्या कडेला आणून सोडले जात असल्याने, पावसाळ्यात त्या कालव्याद्वारे येणारे पाणी शेतात शिरून शेतीचे प्रंचड नुकसान होणार आहे.यामुळे श्रीनिवास कोमवाड यांनी दि २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना अर्ज देऊन बेकायदेशीर पणे कालवा काढण्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.अन्यथा दि ३० एप्रिल पांसुन संपुर्ण कुटूंबाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार उपोषण करून न्याय नाही मिळाल्यास. आत्महन करणार असल्याचा इशारा श्रिनिवास कोमवाड यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबुलगा इटग्याळ रस्त्यावर सद्या लेंडी प्रकल्पाच्या कँनलचे काम चालू आहे. या कँनलवर एक पूल बांधण्यात आले.त्या पुलाच्या खालून एक कालवा काढून.या कालव्या द्वारे पावसाळ्यात वाहत येणारे शेतीचे पाणी थेट गंगाधर कोमवाड यांच्या शेताच्या कडेला आणून सोडण्यात आले.त्यामुळे पावसाळ्यात या कालव्याने वाहत येणारे पाणी कोमवाड यांच्या शेतात शिरून या पाण्यात त्यांची शेती वाहून खरडून जाऊ शकते. हे माहिती असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांने किंवा कंत्राटदाराने याबाबत या शेतकऱ्याला कोणतीही सूचना अथवा नोटीस न देता परस्पर या पुलाचे काम करून कालवा काढून कोमवाड यांच्या शेताच्या दिशेने कालव्याचे पाणी सोडल्या मुळे त्यांची संपूर्ण शेती या पाण्यात वाहून उद्ध्वस्त होऊ शकते.
श्रीनिवास कोमवाड हे आदिवासी समाजातील शेतकरी आहेत.त्यांच्या उपजीविकेचे साधन शेती आहे.याच शेतीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असताना पूल बांधून चुकीच्या पद्धतीने कालव्याचे पाणी त्यांच्या शेताच्या दिशेने सोडून.त्यांची जमीन उद्ध्वस्त केली जात असल्याने.या कुटुंबावर आत्ता उपासमारीची वेळ येणार आहे.त्यामुळे मा. जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी तात्काळ याची दखल घेऊन.या कामास परवानगी देणाऱ्या अधिकारी आणि हे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करुन न्याय द्यावे.अशी मागणी श्रीनिवास कोमवाड यांनी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे केली आहे.

Comments
Post a Comment