चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपीना जेरबंद करण्यात मुखेड पोलिसांना यश
रस्त्यात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपीना जेरबंद करण्यात मुखेड पोलिसांना यश
मुखेड :- बल्खी आसद
गावाकडुन शाळेला जात असताना दबडे शिरुर पाटी जवळ एका शिक्षका सह इतर तालुक्यातील प्रवाशांना मोटारसायकल रस्त्यात आडवी लाऊन चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपीना जेरबंद करण्यात मुखेड पोलिसांना यश आले आहे . एका आरोपीस नायगाव तालुक्यातील टाकळी येथून तर दुस ऱ्या दोघाना मुदखेड तालुक्यातील धनज येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले . आरोपीकडून अधिक चोरीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे .
पोलिसांनी आरोपिंना विश्वासात घेऊन कसुन चौकशी केली आसता आरोपी बालाजी संभाजी महाशट्टे वय १ ९ वर्षे व प्रिन्स उर्फ प्रकाश नानाराव खवास वय वर्षे २५ या दोन्ही आरोपिंनी इतर काही ठिकाणी चाकुचा धाक दाखवून लुटमारि केल्याची कबुली दिली आहे.यामध्ये कंधार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कंधार रोडवरील शेल्लाळी शिवारातील महादेव मंदिर जवळील एक्या इसमास आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्याच्याकडील दागिने , नगदी काही पैसे बळजबरीने काढुन घेऊन लुटमारी केल्याची कबुली दिली आहे .
सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे , उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन सांगळे , मुखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , स.पो.नि.भाऊसाहेब मगरे , पो.उप नि.जि.डी काळे , स्थागु शाखेचे पो.उपनिरीक्षक , सचिन सोनवणे , पोलिस आमलदार आत्माराम कामजळगे , सिध्दार्थ वाघमारे , मोहन माडपत्ते , बाबू मुढे , यांच्या पथकाने कार्यवाही केली आसुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करित आहेत .

Comments
Post a Comment