मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शासन निधी हडप केल्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आरोग्य उपसंचालकाचे नांदेड जिल्हाशल्य चिकित्सकांना आदेश
मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शासन निधी हडप केल्या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करा
मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शासन निधी हडप केल्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आरोग्य उपसंचालकाचे नांदेड जिल्हाशल्य चिकित्सकांना आदेश
मुखेड :- बल्खी आसद
शासनाची फसवणूक करुन शासन निधी हाडप करणा - या वैद्यकिय अधिकारी यांच्यासह संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी तक्रार तक्रारकर्ते जयभीम नरसिंगराव सोनकांबळे यांनी दि ०८ फेबुरवारी २०२१ रोजी आरोग्य उपसंचालक लातूर यांच्याकडे केली होती त्या तक्रारी अर्जाची दखल घेत आरोग्य उपसंचालक यांनी मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश नांदेड जिल्हाशल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे दिले आहे.
आरोग्य उपसंचालकाचे जिल्हाशल्य चिकित्सकांना चौकशी करून अहवाल पाठवण्याचे आदेश आल्या मुळे मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व संबंधिताची तारांबळ उडणार आहे हे मात्र नक्की

Comments
Post a Comment