राज्यात लॉकडाऊन नाही ; मात्र 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध.
राज्यात लॉकडाऊन नाही ; मात्र 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध. महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा केल्या सील
राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा स्फोट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या विभागात निर्बंधांकडे दुर्लक्ष केले जात आहे तिथल्या अधिकार्याला जबाबदार धरून तिथे कठोर निर्बंध लादण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासी पार पडलेल्या टास्क फोर्सच्या विशेष बैठकीत राज्यभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. चिंताग्रस्त स्थितीत हॉस्पिटल्सची उपलब्धता, तिथल्या बेड्सची संख्या, औषधांचा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा याबाबत सविस्तर चर्चेत उणिवांबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोना संसर्गाच्या गंभीर स्थितीत कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत करण्यात आली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्या ठिकाणी अधिक कडक निर्बंध करून गर्दी टाळण्याचे मार्ग आखून दिले जातील. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत चुकारपणा होऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन करू नये, असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रवाह आहे. याचे विपरित परिणाम होत असल्याचे बहुतांश राजकीय पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे लॉकडाऊन न करता निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांचे काम ‘वर्क फ्रॉम होम’नुसार केले जावे, असेही बैठकीत सूचित करण्यात आले आहे. राज्यात सुरू असलेली रात्रीची संचारबंदी तशीच सुरू ठेवली जाणार आहे.
या दरम्यान काय काय बंद राहणार ?
अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी गाड्यांना परवानगी नाही. रिक्षामध्ये दोनच प्रवाशांना परवानगी. उद्यान, मैदानं, बंद राहणार. शनिवार-रविवार संपूर्ण लॉक डाऊन. हॉटेल्सना फक्त पार्सल साठी परवानगी. चित्रपटगृह, मॉल्स पूर्णपणे बंद राहणार. मॉल, रेस्टॉरंट ,बार, चित्रपटगृह, नाट्यग्रह पूर्णपणे बंद. काय सुरू राहणार रिक्षा टॅक्सी खाजगी बसेस सुरू राहणार मुंबई लोकल वाहतूक सुरू राहणारसर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार ईडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.

Comments
Post a Comment