महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला, 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला, 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
दि.28 : 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patient) स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्कामोर्तब झालंय. या संदर्भात झी24 ने वृत्त दिले आहे.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मे ला लसीकरण सुरू होणार नसल्याचे टोपे म्हणाले. 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणासाठी वेगळे केंद्र असणार आहेत. केवळ सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावरच मिळणार मोफत लस मिळतील. खासगी रूग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

Comments
Post a Comment