पत्रकार सन्मान सोहळ्यातही खा.प्रताप पाटलांची गटबाजी !

 पत्रकार सन्मान सोहळ्यातही खा.प्रताप पाटलांची गटबाजी !

मुखेड तालुक्यातील अनेक पत्रकारांना डावलले

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त 


मुखेड  प्रतिनिधि :-

भारतीय जनता पक्षात खा . प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रवेशापासूनच पक्षातील जुने निष्ठावंत व नवीन कार्यकर्त्यात गटबाजी असल्याचे दिसून येत असतानाच आता दर्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात मुखेडच्या अनेक पत्रकारांना डावलण्यात आले आहे . सन्मान सोहळ्यातही खासदारांनी केलेल्या गटबाजीमुळे मुखेडच्या अनेक पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे .

  खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने | जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा शनिवारी | नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात तालुक्यातील मोजक्याच पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले . तालुक्यातील बहुतांश पत्रकार बांधवांना सन्मान सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली . तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रित करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकारीकडे देण्यात आल्याचे समजते.जाणीवपूर्वक पत्रकारांना डावळल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला . यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पत्रकार भारत सोनकांबळे, कार्याध्यक्ष आसद बल्खी,तालुका उपाध्यक्ष,नरसिंग अस्वले , गणेश आडे,तालुका सचिव मोतीपाशा पाळेकर,कोषाध्यक्ष शेख चाँद सावरगावकर, रमेश राठोड,विठ्ठल पाटील येवतीकर आदींनी पत्रकार सन्मान कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन व नियोजन केले त्यांचा अनेक पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान