शिधापत्रिकेतील लूट थांबवा,तात्काळ निराधारांच्या पैशाचे वाटप सुरू करा-कलंबरकर
शिधापत्रिकेतील लूट थांबवा,निराधारांच्या पैशाचे वाटप सुरू करा-कलंबरकर
मुखेड तालुक्यातील सामान्य नागरिकांना शिधापत्रिकेसाठी प्रचंड अडवनूक केली जात आहे.पुरवठा विभागाकडे नागरीकांना सारखी पायपीट करावी लागत आहे.पुरवठा विभागाकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे.अडवणूक करून सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे.
शिधापत्रिका अनेक ठिकाणी आवश्यक झाली आहे.शैक्षणिक कामासाठी सर्वाधिक आवश्यक शिधापत्रिका आहे.पुरवठा विभाग कोणत्याही नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध नाही असे कारण दीड वर्षपासून देत आहे.आतून अनेकांना शिधापत्रिका उपलब्ध होत आहे,हे बंद झाले पाहिजे.मुखेड तालुक्यातील निराधारांचे मानधन वाटप गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे वयस्कर मंडळी कार्यालयाला मानधनासाठी सारख्या चकरा मारत आहेत.हे मानधन वाटप तात्काळ सुरू करण्याचे आदेश,संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत व मुखेड पुरवठा विभागात शिधापत्रिकेत होणारी अडवणुक व लूट थांबविण्यासाठी कार्यवाही करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपविभागीय कार्यालयाकडे निवेदनातून केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून निराधारांचे मानधन रखडले आहे.ज्या नागरिकांना कोनाचाही आधार नाही व वयस्कर नागरिक लोक कार्यालयाकडे चक्रा मारत आहेत.थांबलेले निराधाचे पैसे तात्काळ वाटत करण्याचे आदेश मुखेड तहसील कार्यालयाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दिले पाहिजेत.,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपविभागीय कार्यालयाकडे निवेदनातून केली आहे.

Comments
Post a Comment