भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन निघुन हत्या करणाऱ्या आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय प्रक्रिया चालवून तात्काळ फासावर चढ़वा "शेकापचा" मुख्यमंत्रीना निवेदन
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन निघुन हत्या करणाऱ्या आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय प्रक्रिया चालवून तात्काळ फासावर चढ़वा "शेकापचा" मुख्यमंत्रीना निवेदन
मुखेड :- भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील एका शेतमालकाच्या ५ वर्षीय चिमुकलीवर सालगडी बाबू खंडू सांगेराव याने अत्याचार करून खून करुन चिमुकलीचे प्रेत सुधा नदीपात्रात फेकून दिले. हि घटना मन हेलावून टाकणारी दुदैवी तथा निशेधार्थ , अमानुष , माणुसकीला काळीमा फासणारी अमानवीय कृत्याची गंभीर गुन्ह्याची ही घटना असल्याने सर्वत्र संताप व निषेध व्यक्त होत असून, त्या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय प्रक्रिया चालवून तात्काळ फासावर चढवून बालिकेला न्याय मिळून द्यावा. अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष मुखेडच्या वतीने करण्यात आली आहे.
भोकर तालुक्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुकल्या बालिकेस पळून नेऊन तिच्यावर अत्याचार करून निर्घृण खून केला. हि घटना दि .20 / 01 / 2021 रोजी दुपारी 2 ते 4 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे, एवढेच नाहीतर चिमुकलीचा मृतदेह तेलंगाणा सीमेजवळ सुधा नदीपात्रात फेकून देऊन आरोपी चिमुकलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून, त्या मुख्य आरोपीस टक करण्यात आले आहे
आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष मुखेडच्या वतीने करण्यात आली आहे. सरकारने व शासनाने या नराधमास बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक ( पोस्को ) अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय प्रक्रिया चालवून तात्काळ फाशिची शिक्षा द्यावी निवेदन देऊन केली आहे. यावेळी भाई पांडुरंग लंगेवाड,भाई बबलु एस. के,भाई आसद बल्खी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,व संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment