महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नामदेव यलकटवार यांची निवड
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नामदेव यलकटवार यांची निवड
मुखेड प्रतिनिधि :-
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नामदेव यलकटवार यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचा नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी नरेंद्र येरावार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यध्याक्ष व मार्गदर्शक विलासराव कोळेकरांनी निवड दि.२१ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे श्री.नामदेव यलकटवार यांची निवड जाहीर केली. आपल्या जिल्ह्यात पत्रकार संघटन प्रभावीपणे उभ करून पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी व छोट्यामोठ्या वर्तमानपत्राच्या मागण्यासाठी लढा उभा करावा असे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सांगितले. यलकटवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे खा.हेमंत पाटील,खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.राम पाटील रातोळीकर,आ.रावसाहेब अंतापुरकर,आ.डाॅ.तुषार राठोड,आ.मोहनराव हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर यांच्या भाजपाचे नेते माधव अण्णा साठे , निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,प्रविण फुलारी,शक्ती कदम,प्रशांत खेडेकर, पांडुरंग बोरगांवकर,दिलीप स्वामी,अंकुश पिनाटे, संपादक जयभीम सोनकांबळे,आसद बल्खी ,पत्रकार शेख महेताब,भारत सोनकांबळे आर्दीसह अनेकांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Comments
Post a Comment