मुखेड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीवर काॅग्रेस व मित्र पक्षांचे वर्चस्व : माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा दावा...
प्रतिनिधि:- बल्खी आसद। नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने ७० ग्रामपंचायतीवर ताबा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे . निवडून आलेल्या पदाधिका - यांचा मा.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला . निवडणुका जाहीर झाल्यापासून गावागावातील वाद मिटवून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सहकारी , प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करीत होते पण ज्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध होवू शकल्या नाहीत अशा ठिकाणी काँग्रेस पक्ष मित्र पक्षाच्या सहकार्याने तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकजुटीने व मजबुतीने निवडणुका लढविण्यात आल्या होत्या . या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते , नेतृत्व करीत असलेल्या बहुतांशी ग्रामपंचायती मध्ये विजय मिळविला असून मतदारसंघातील काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाच्या विजयामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे . मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आजपर्यंत भरघोस निधी उपलब्ध करुन दिला असून यापुढेही सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींना मा . ना . श्री अशोकरावजी चव्हाण , पालकमंत्री यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा . आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जाहीर केले . मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व मित्र पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये व तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मनापासून आभार व्यक्त केले . तसेच यापुढील निवडणुका मध्ये सुध्दा काँग्रेस व मित्र पक्षाच्या पाठीशी राहून सहकार्य करावे अशी विनंती मा . आ . हणमंतराव पाटील यांनी पत्रकार परिषद मद्दे सांगण्यात आले यावेळी पत्रकार बंधुच स्वागत पण करण्यात आले या वेळी उपस्तित माजी आ. हणमंतराव पा.बेटमोगरेकर शेषेराव चव्हाण,दिलीप पाटिल बेटमोगरेकर,सुभाष पाटिल दापकेकर,राजन देशपांडे, चंद्राकांत घाटे,राजीव पाटिल रावणगावकर, शिवलिंग पाटिल कामजळगेकर,शौकत खाँन पठान,नंदकुमार मडगुलवार,उत्तम चोधरी, दिलीप कोडगिरे,श्रावण रॅपनवाड,शौकत होनवडजकर,रामेश्वर इंगोले,दयानंद कांनगुले,मारोती घाटे,विशाल गायकवाड, आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तित होते. निवडून आलेल्या गांव चे नाव खालील प्रमाणे 1)सावरगाव पी 2) लादगा 3) होडाळा 4) कामजळगा 5) सावरगाववाडी 6) मंग्याळ ( शिवसेना) 7) दापका राजा 8) नागर जांब 9) होकर्णा ( शिवसेना) 10) पांडुर्णी ( शिवसेना) 11) खैरका 12) बेरळी (बु) 13) बेरळी(खु) 14) चिवळी 15) दापका (गु) 16) तग्याळ 17) डोरणाळी 18) वडगाँव 19) भिगोली 20) चव्हाण वाडी 21) गोजेगांव (आघाडी) 22) सावळी 23) देगाव 24) इटग्याळ (प. मु) युती (शिवसेना) 25) मरशिवनी 26) नंदनशिवनी 27) बोळका 28) कारनाळा 29) 30) बारहली 31) जिरगा 32) चांडोळा 33) भगनूर (शिवसेना) 34) खरब खडगांव 35) सलगरा (बु) 36) सलगरा (खु) 37) बावलगांव 38) हंगरगा (प.क) 39) खतगांव (प. दे) 40) बेटमोगरा 41) मॉऊली 42) नंदगांव (प.क) 43) डोंगरगांव 44) एकलारा 45) आडलूर (नंदगांव) 46) धनज ( आघाडी) 47) उन्द्री (प. दे) 48) हस्नाळ (शिवसेना+काँग्रेस) 49) राजुरा (बु) 50) जाहुर 51) बिल्हाळी 52) भासपुर (प. दे) 53) रावणगांव 54) सांगवी (राष्ट्रवादी) 55) भासवाडी 56) इटग्याळ (प.मु) 57) हस्नाळ (प. मु) 58) येवती 59) पाळा 60) तूपदाळ 61) तादळी 62) उमरदरी (रॉ.कॉ) 63) जाम्बळी 64) होनवडज 65) मंडलापुर 66) तारदळा 67) कोळनुर 68) मेथी आदि.

Comments
Post a Comment