लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन
नांदेड मध्ये पहिल्यांदाच पतंग महोत्सवाचे आयोजन
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवार दि.१७ जानेवारी २०२१ रोजी नांदेड मध्ये पहिल्यांदाच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये माध्यम प्रतिनिधी सह विविध गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड मीड टाऊनचे अध्यक्ष लॉ. जुगलकिशोर अग्रवाल,लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि लॉ. शिरीष कासलीवाल यांनी दिली आहे.
नवा मोंढा मैदानावर दुपारी १ ते ४ या वेळेत पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विविध गट ठेवण्यात आले असून प्रत्येक गटातील तिघांना पाचशे, तीनशे आणि दोनशे रुपयाचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. १८ वर्षाखालील मुले, १९ ते ४० वर्षापर्यंतचे पुरुष,४० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व वयोगटातील महिला तसेच माध्यम प्रतिनिधी असे पाच गट करण्यात आले आहेत. स्पर्धेमध्ये नोंदणी निशुल्क असून इच्छुकांनी स्वतः पतंग व दोऱ्या सगट चरखा आणायचा आहे.नायलॉन अथवा चायना मांजाला परवानगी नाही. तसेच आकर्षक पतंग बनविणाऱ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. लॉयन्स परिवारातील सदस्यांसाठी पतंगाची व चरख्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी रात्री सात वाजेपर्यंत लॉ. मनीष माखन मोबाईल क्र.९८२३३ ७२४६४ अथवा लॉ. सुनील साबू मोबाईल क्र.९४२२१७००९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लॉ.ॲड. उमेश मेगदे,लॉ. शिरीष गीते यांनी केले आहे

Comments
Post a Comment