अमेरिकेच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवुन मुखेड च्या तरुणाला ७ लाखाला फसविले
अमेरिकेच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवुन मुखेड च्या तरुणाला ७ लाखाला फसविले
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
नांदेड : अमेरिकेच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मुखेड येथील एका तरुनास ७ लाख रुपयांना फसविले आहे हा प्रकरण नुकतेच उघडकीस आले असून याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना आणि देशात बेरोजगारी वाढली असुन सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी नौकरीसाठी दर दर फिरत आहे यांचा फायदा घेत नोकरीधंदा नसणाऱ्या युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसापासून सर्रासपणे सुरू आहे. अशा आमिषाला बळी पडणाऱ्या घटना दिवसन दिवस वाढत आहे . या प्रकारेच दि.31 जुलै 2020 ते 12 ऑक्टोबर 2020 या दरम्यान आरोपीने व्हाट्सअप आणि फेसबुक द्वारे अमेरिकेच्या कंपनीचा संचालक असल्याचे भासवून तुला अमेरीकेमध्ये नोकरी, अमेरीकेला जाण्यासाठी लागणारी परवानी (व्हीसा) हे सर्व मिळवून देतो असे सांगितले. विनय शेकापुरेकडून फोन सांगून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सदर तोरणाच्या फोन पे वरून स्वतःच्या खात्यावर सात लाख रुपये जमा करून घेतले .त्यानंतर त्या युवकास बनावट मुलाखत पत्र पाठविण्यात आले. बनावट मुलाखत पत्र घेऊन तो युवक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील दूतावासाच्या कार्यालयात गेला असता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बोलावणे अथवा त्याला मुलाखत पत्र पाठवण्यात आले नसल्याचे उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेकापुरेनी मुखेड पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीसांनी विनय शेकापुरेच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 12/2021 कलम भारतीय दंडसंहितेच्या 420 आणि 66(डी) तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नरसींग अंकुशकर हे करीत आहेत.

Comments
Post a Comment