हिमायतनगर शहराच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये भिषण पाणी टंचाई
हिमायतनगर शहराच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये भिषण पाणी टंचाई
नगर पंचायत चे दुर्लक्ष
हिमायतनगर प्रतिनिधि :- सय्यद अजीम हिमायतनगर शहरामध्ये आंबेडकर नगर परिसरात वार्ड क्रमांक 7 मध्ये 10 दिवसापासून भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे
याचे कारण असे की,1063 लोकसंख्येचा वार्डा मध्ये तिन बोअर मारण्यात आले होते.
त्या पैकी बौद्ध विहार जवळील बोअर डगरून गेला होता, बाकी दोन बोअरावर ह्या वार्डातील नागरिक पाणी भरत होते. त्यातील जनता कॉलनी शाळा जवळील बोअर व, अण्णाभाऊ साठे नगर गल्लीतील बोअर नादुरुस्त झाले असल्यामुळे संपूर्ण वार्ड क्रमांक 7 मध्ये गेल्या 10 दिवसापासून भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
वार्डातील महिला व,लहान मुलांना डोक्यावर भांडे ठेवून दुरून पाणी आणावे लागत आहे गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, हैद्राबाद, औरंगाबाद, आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी. या साठी बहुजन वंचित आघाडी चे कार्यकर्ते विशाल हनवते, स्वप्नील हनवते, प्रमोद हनवते,व त्यांचे सोबत इतर कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन येत्या दोन दिवसात बोअर चालू करून नाही दिल्यास हिमायतनगर नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Post a Comment