महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सायकलिंग 2020 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सायकलिंग 2020 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद



 
मुखेड : -
           शहराच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या फिट इंडिया मुव्हमेंट उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा - 2020 आयोजित करण्यात आले होते.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी महेंद्र आडके , उद्घाटक तहसीलदार काशिनाथ पाटील , पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर , प्रमुख उपस्थिती वीरभद्र शिक्षण संस्थेचे सचिव रणजीत पाटील हंगरगेकर , ग्रामीण महाविद्यालय वसंतनगरचे प्राचार्य डॉ. एच.बी.राठोड , संस्थेचे ज्येष्ठ सदस्य शिवराज पाटील हंगरगेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे , प्रा. सी.बी. साखरे , दै.लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार , पत्रकार सुशील पत्की , अँड.आशिष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सी.एन.एकलारे नरंगलकर यांनी केले.
        वर्तमान काळातील पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचे गांभीर्य लक्षात घेऊन निरोगी आयुष्य जगण्यासाठी केंद्रशासनाच्या फिट इंडिया मुव्हमेंट उपक्रमांतर्गत सायकल स्पर्धा घेतल्यामुळे समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करणारे महाविद्यालय म्हणून पाहिले जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रयदाते म्हणून बँक ऑफ बडोदा , जोशी इन्फोटेक , नांदेड सायकल असोसिएशन , पंकज स्पोर्ट्स वेअर , प्रा.एस.जी.गोरे ,स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल , गणेश फूड प्रॉडक्ट्स , दै. लोकसंकेत यांनी साहित्य खरेदी साठी आणि इतर कार्यासाठी आर्थिक व वस्तू देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी 101जणांनी केले.प्रत्यक्षात 75 स्पर्धकांनी सहभाग नोंदविले आहेत.
           सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी शहरी भागातून सर्वप्रथम राष्ट्रीय खेळाडू गणेश काकडे , द्वितीय नंदकिशोर साखरे , तृतीय नारायण कंधारे तर ग्रामीण भागातील सर्वप्रथम तुकाराम  रेणगुंटवार , द्वितीय रोहित बरगे , तृतीय उद्देश चौधरी आणि मुलींमध्ये सर्वप्रथम प्रीति चव्हाण, द्वितीय सीमा राठोड , तृतीय ज्योती कांबळे यश संपादन केले आहे. यशवंत स्पर्धकांना रोख रक्कम , ट्रँक सुट , समृतिचिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
          या सायकलिंग स्पर्धेचे आयोजक शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. जे.जी. कहाळेकर , सहसंयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर , प्रा.डॉ. सी.एन.एकलारे , प्रा.डॉ. एस.बी.गायकवाड व क्रीडा संयोजन समिती त्यांनी अथक परिश्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले . सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य राजे छत्रपती अकॅडमी यांचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्य केले तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णवाहिका व त्यांची टीम , पोलीस बंदोबस्त अतिशय चोखपणे करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी , स्पर्धक , नागरिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान