मुखेड टेंन्ट हाऊस असोसिएशन च्या वतिने तहसिल समोर धरणे आंदोलन
मुखेड टेंन्ट हाऊस असोसिएशन च्या वतिने तहसिल समोर धरणे आंदोलन
मुखेड / प्रतिनिधी
टेंन्ट हाऊस असोसिएशन च्या वतिने मुखेड तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून, तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले. महाराष्ट्र टेंन्ट,साऊंड, मंगलकार्यालय,केटरर्स यांना तात्काळ आर्थिक मदत देवून.लग्न समारंभास 500 व्यक्तीची परवानगी द्यावी.कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठया आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
अनेक व्यवसाय धारकांनी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम, हॉल , मंगल कार्यालय,किरायाने घेतले आहेत.त्यामुळे हि परिस्थीती सामान्य होई पर्यंत त्यांचे भाडे घेऊ नये, असे निर्देश काढावेत. टेन्ट,मंडपामध्ये होणारे विवाह समारंभावर लागणरा जी. एस. टी.वधु पित्याला परत मिळण्याचे तरतूद करावी. कारण हिंन्दु विवाह धर्मानुसार कन्या दान एक संस्कार आहे.ते सामाजिक उत्सव नाही.कर्जधारकांचे व्याज माफ करावेत.सर्व टेंन्ट मंडप व्यवसायधारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा.टेेंन्ट व्यावसायाशी संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडी ची तरतुद करावी.टेंन्ट,व्यावसायिकांच्या खात्यात मदत राशी जमा करावी. या व्यवसायाच्या अडचणी लक्षात घेऊन.वेगवेगळ्या मदत पॅकेजची घोषणा करावी.तसेच टेन्ट , कैटरिंग व्यावसायिक बिलांचे भुगातन लवकरात लवकर करावे.अशा विविध मागण्या करण्यात आले होते.
त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक,धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे टेंन्ट,मंडप, कॅटरिंग,मंगल कार्यालय , बॅक्वेट हॉल, डि.जे. , साऊंड,लाईट , डेकोरेशन , इव्हेंट व्यवस्थापक , इत्यादी सेवा देणारे लाखो व्यवसायिक लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे मानसिक तनावाखाली येऊन आत्महत्या करण्यास प्रेरित होत आहे.त्यामुळे टेंन्ट मंडप,मंगल कार्यालय ,बॅक्वेट हाॅल,लाॅन्स ,कॅटरिंग ,ईव्हेंट मॅनेजमेंट,साऊड, लाईट , डेकोरेशन यांना प्रवानगी देऊन सहकार्य करावे यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.यावेळी मंडप डेकोरेश्न असोशियन अध्यक्ष राम गोविंदराव पत्तेवार ,उपध्याक्ष रमेश गोविंदराव भागवतकर ,सचिव मारोती स श्रीराम गज्जेवार ,संतोष मरेवार,रत्नाकार कुलकर्णी अदिजण या आंदोलनात उपस्थित होते.

काही लुटायला चांस नाही बाबा
ReplyDeleteआत्ता आसच चालनार
ReplyDelete