मुक्रमाबाद येथे कोरोणाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची दक्षता घेत मोहरम व एक गाव.... एक गणपती
कोरोणाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची दक्षता घेत मोहरम व एक गाव.... एक गणपती
---------------------------------------------------------------------------
अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ताराम राठोड यांच्या
मुक्रमाबाद (प्रतिनिधी ) येथे नांदेड ज़िल्हा पोलिस दल अंतगर्त पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे भवानी मंदिर सभागृह येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली .मुक्रमाबाद शहरासह परिसरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षासह प्रतिष्ठित नागरिकांची व मुस्लिम बांधव, मौलवी यांची बैठक पोलिस अप्पर अधीक्षक श्री दत्ताराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पोलीस उपविभागीयअधिकारी रमेश सरवदे व मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.कमलाकर गड्डीमे,मरखेल पोलीस स्टेशनं चे लोणीकर व मुक्रमाबाद चे पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे मुक्रमाबाद येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.जगदीश गायकवाड व मुक्रमाबाद चे सरपंच प्रतिनिधी शिवराज अप्पा आवडके, सुभाष अप्पा बोधणे यांनी मुक्रमाबाद शहरातील व परिसरातील सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना व मोहरम निमित्त मुस्लिम बांधवाना पदाधिकार्यांना ,प्रतिष्ठित नागरिकांना विश्वासात घेऊन देशात चालु असलेले कोरोना [ कोवीड १९ ] या महासंकटाविषयी माहीती देऊन सर्वांना एक गाव एक गणपती बसविण्याची विनंती केली व मोहरम साठी मिरवणूक काढू नये.उपविभागीय पो.अ सरवदे यांनी जान है तो जहाँ है असे उदगार काढून सभेस संबोधीत केले. व तसेच वैधकीय अधिकारी जगदिश गायकवाड , आवडके शिवराज अप्पा,सुभाषअप्पा बोधणे माजी सरपंच सदाशिव बोयवार यांनी आपले मत मांडले मुक्रमाबाद शहरात प्रथम हे करण्याचे ठरले तर मला सर्व परिसरात मदत होईल हे सुद्धा मत व्यक्त केले. ते आम्ही मुक्रमाबाद शहरातील सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकार्यांनी व गावातील सर्व जेष्ट मार्गदर्शक या सर्वांनी एकमुखाने या विनंतीला मान देऊन मुक्रमाबाद शहरात एक गाव एक गणपती बसविण्याचे मान्य केले.व मुस्लिम बांधवानी आम्ही मोहरम ची मिरवणूक काढणार नाही असे आश्वासन दिले. पोलिस प्रशासनास व आरोग्य खात्यास सहकार्य होईल. मुक्रमाबाद शहरातील सर्व गणेश मंडाळाच्या अध्यक्षासह सर्व पदाधिकार्यांनी जेष्ट मार्गदर्शक व प्रतिष्ठीत नागरीकांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. अप्पर अधीक्षक राठोड सर यांनी सभेची अध्यक्ष समारोप बोलते वेळेस ज्यांनी शासनाला मदत करेल त्याना एक चांगल्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात येईल. गावातील नागरिक मुक्रमाबाद शहरातील व परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकासह,सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षासह ,पदाधिकार्यासह ,पञकार बांधव,मुस्लिम समाज बांधव तरुण मिञमंडळी बहुसंख्येनी उपस्थित होते.
व या सभेला यशस्वी करण्यासाठी मुक्रमाबाद पो.ठाण्याचे सा.पो.नि.कमलाकर गड्डीमे.बिटजमादार आडेकर पोलीस प्रशासणातीय गोपनिय शाखेचे जलकोटे, ईबीतवार, सर्व मुक्रमाबाद पोलीस स्टॉप यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाची आभार प्रकट बिटजमादार आडेकर यांनी मानले.

Comments
Post a Comment