स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी स्टडी पॉइंट चालु करण्यास परवानगी दया :- डॉ ए पी जे अब्दुल कलाम सेवा समिती

 मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद 

 मुखेड शहरात गेल्या काही वर्षा पासुन स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी स्टडी पॉइंटची सुरवात करण्यात आलेली होती कालांतराने जगभरात कोरोना सारख्या भयंकर अशा महामारीच्या संकटात जग सापडलेले यश मुखेड तालुक्यात शेतकरी ,कष्टकरी,कामगारांची विद्यार्थी आहेत जे अभ्याससाठी स्टडी पॉइंट वर स्पर्धा ची तयारी करतात सध्या येणाऱ्या काही महिन्यातच  स्पर्धा च्या परीक्षेस सुरवात होणार आहे आणि गेल्या चार पाच महिन्या पासून स्टडी पॉइंट बंद आहे याच परिणाम विद्याथीच्या अभ्यासावर होत आहे .विद्यार्थी शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करूनच स्टडी पॉइंट  मध्ये  अभ्यास करणार आहे असे निवेदनात सांगितले आहे एकीकडे शासन बियर बार व दारू दुकान चालकाना परवानगी देण्यात येते  तर स्टडी पॉइंटची सुरवात करण्यास का नाही असा प्रश्न विद्यार्थी शासनाला विचारत आहेत

 आजचा युवा पीढी,विद्यार्थी हा या देशाचा भविष्य आहे आशा विद्यार्थीचे भविष्य आपल्या व तुमच्या हातात आहेत याच भविष्यखराब न करता शासनने तात्काळ स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी स्टडी पॉइंट चालु करण्यास परवानगी  देऊन विद्यार्थीना सहकार्य करावे  निवेदन देताना डॉ ए पी जे अब्दुल कलाम सेवा समितीचे सदस्य एस के बबलु,इमरान अत्तार आदी उपस्तित होते 


Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान