बेटमोगरा येथील एकाच कुटुंबातील आठ जनांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
बेटमोगरा येथील एकाच कुटुंबातील आठ जनांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
बेटमोगरा वासियांच्या चिंतेत पुन्हा वाढ
बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील बेटमोगरा येथील दि.१३ ऑगस्ट रोजी एका ६० वर्षीय पुरुषाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील एकून नऊ जनांच्या स्वॅब तपासणीसाठी मुखेड येथील कोव्हिड सेंटरला पाठविण्यात आले असून त्या नऊ जणांची एंटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता त्या नऊ जनांपैकी सात जनांच्या अहवाल दि.१४ रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
त्या आठ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष व चार महिलांच्या समावेश असून त्यांचे वय ६०,४२,२२,१९,१८,५५,६०,१९ असे आहे.
तसेच त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या बाधित ठिकाणाला वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ फारुक शेख, डॉ मनिषा भोरे, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलूरे, सुरेश ढगे, बालाजी शिंदे यांनी बाधित ठिकाणाला भेट देऊन सिल करुन सर्वेक्षण सुरू केले. त्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची तब्येत ठीक आसल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या जोरदार शिरकाव बेटमोगरा सारख्या ग्रामिण भागात झाल्याने बेटमोगरा वासियांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
9404669714
ReplyDelete