Posts

Showing posts from August, 2020

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी:- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ

Image
 मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी  देगलूर (प्रतिनिधी)  राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना, व्यवसाय परीक्षण व अन्य योजना राबविण्यासाठी सन २००० मध्ये मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब व गरजूंना लघुउद्योग व व्यवसाय करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाती.  परंतु मागील काही वर्षांपासून महामंडळाच्या योजनांवर पुर्ण पणे अमलबजावणी होत नाही. तसेच या सर्व योजनांमध्ये आवश्यक बदल करून कर्जाची रक्कम, मुदत, उत्त्पन्नाची अट यात बदल करणे करजेचे आहे जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त गरजूंना लाभ घेता येईल.   मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिक सक्षमीकरण करुन त्या माध्यमातून अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. महामं...

मुक्रमाबाद येथे कोरोणाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची दक्षता घेत मोहरम व एक गाव.... एक गणपती

Image
 कोरोणाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची दक्षता घेत मोहरम व  एक गाव.... एक गणपती --------------------------------------------------------------------------- अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ताराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न   मुक्रमाबाद (प्रतिनिधी ) येथे नांदेड ज़िल्हा पोलिस दल अंतगर्त पोलीस  स्टेशन मुक्रमाबाद तर्फे भवानी मंदिर सभागृह येथे शांतता समितीची बैठक  घेण्यात आली .मुक्रमाबाद शहरासह परिसरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षासह प्रतिष्ठित नागरिकांची व मुस्लिम बांधव, मौलवी यांची बैठक पोलिस अप्पर अधीक्षक श्री दत्ताराम राठोड  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  पोलीस  उपविभागीयअधिकारी रमेश सरवदे व मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.कमलाकर गड्डीमे,मरखेल पोलीस स्टेशनं चे लोणीकर व मुक्रमाबाद चे  पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे मुक्रमाबाद येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.जगदीश गायकवाड व मुक्रमाबाद चे सरपंच प्रतिनिधी शिवराज अप्पा आवडके, सुभाष अप्पा बोधणे  यांनी मुक्रमाबाद शहरातील व परिसरातील सर्व गणेश मंडळाच्या ...

स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी स्टडी पॉइंट चालु करण्यास परवानगी दया :- डॉ ए पी जे अब्दुल कलाम सेवा समिती

Image
 मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद   मुखेड शहरात गेल्या काही वर्षा पासुन स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी स्टडी पॉइंटची सुरवात करण्यात आलेली होती कालांतराने जगभरात कोरोना सारख्या भयंकर अशा महामारीच्या संकटात जग सापडलेले यश मुखेड तालुक्यात शेतकरी ,कष्टकरी,कामगारांची विद्यार्थी आहेत जे अभ्याससाठी स्टडी पॉइंट वर स्पर्धा ची तयारी करतात सध्या येणाऱ्या काही महिन्यातच  स्पर्धा च्या परीक्षेस सुरवात होणार आहे आणि गेल्या चार पाच महिन्या पासून स्टडी पॉइंट बंद आहे याच परिणाम विद्याथीच्या अभ्यासावर होत आहे .विद्यार्थी शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करूनच स्टडी पॉइंट  मध्ये  अभ्यास करणार आहे असे निवेदनात सांगितले आहे एकीकडे शासन बियर बार व दारू दुकान चालकाना परवानगी देण्यात येते  तर स्टडी पॉइंटची सुरवात करण्यास का नाही असा प्रश्न विद्यार्थी शासनाला विचारत आहेत  आजचा युवा पीढी,विद्यार्थी हा या देशाचा भविष्य आहे आशा विद्यार्थीचे भविष्य आपल्या व तुमच्या हातात आहेत याच भविष्यखराब न करता शासनने तात्काळ स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी स्टडी पॉइंट चालु करण्यास परवानगी  ...

बेटमोगरा येथील एकाच कुटुंबातील आठ जनांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

बेटमोगरा येथील एकाच कुटुंबातील आठ जनांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह बेटमोगरा वासियांच्या चिंतेत पुन्हा वाढ बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी तालुक्यातील बेटमोगरा येथील दि.१३ ऑगस्ट रोजी एका ६० वर्षीय पुरुषाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील एकून नऊ जनांच्या स्वॅब तपासणीसाठी मुखेड येथील कोव्हिड सेंटरला पाठविण्यात आले असून त्या नऊ जणांची एंटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता त्या नऊ जनांपैकी सात जनांच्या अहवाल दि.१४ रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. त्या आठ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष व चार महिलांच्या समावेश असून त्यांचे वय ६०,४२,२२,१९,१८,५५,६०,१९ असे आहे. तसेच त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या बाधित ठिकाणाला वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ फारुक शेख, डॉ मनिषा भोरे, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलूरे, सुरेश ढगे, बालाजी शिंदे यांनी बाधित ठिकाणाला भेट देऊन सिल करुन सर्वेक्षण सुरू केले. त्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची तब्येत ठीक आसल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या जोरदार शिरकाव बेटमोगरा सारख्...

लेंडी प्रकल्पग्रस्त विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; आधी पुनर्वसन मग च धरण यावर ठाम निवेदनाद्वारे दिला आंदोलन चा इशार

लेंडी प्रकल्पग्रस्त विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; आधी पुनर्वसन मग च धरण यावर ठाम निवेदनाद्वारे दिला आंदोलन चा इशारा मुखेड/ प्रतिनिधी बल्खी आसद मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी नदीवर होत असलेले लेंडी आंतरराज्य प्रकल्प चे रखडकेले काम सुरू करण्या पूर्वी 12 गावातील बुडीत क्षेत्रातील गावांतील जमीन आणि घराचा मावेजा वाढवून द्यावा हा मावेजा 1894 साल च्या विधेयकनुसार मागील काळात देण्यात आला यापैकी मुक्रमाबाद येथील घराचा मावेजा 2013 च्या नवीन भूसंपादन विधेयक नुसार चार पट वाढीव मावेजा देण्यात आला मुक्रमाबाद येथील घरचा मावेजचा अवॉर्ड 2010 / 11 साली झालेला असताना अवॉर्ड रदबदल करून 2015/ 16 नवीन अवार्ड करून 2020 साली मावेजा वाटप करण्यात आला मग इतर बुडीत क्षेत्रातील गावांना जुन्या 1894 चा निजाम कालीन कायद्याने मावेजा का देण्यात आला ? जो न्याय त्यांना दिला तो ही आम्हाला द्यावे लागेल अन्यथा येत्या काळात धरणाचे काम मागण्या मंजूर होई पर्यत सुरू होऊ देणार नसल्याचे भूमिका असल्याचे संघर्ष समिती चे राजू पाटील रावनगवकर यांनी सांगितले याबाबत विविध मागण्या संदर्भात एक निवेदन तहसीलदार मार...