Unlock 1 | नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये आजपासून धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार

Unlock 1 | नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये आजपासून धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार


कोरोना संकटात धार्मिक स्थळं आणि मॉल सुरु करण्यापूर्वी खबदारी म्हणून हरतऱ्हेची पावलं उचलण्यात आली आहेत. धार्मिक स्थळाचा परिसर सॅनिटाईज केला जाल आहे. तर मॉलमध्ये आता शॉपिंग करणाऱ्यांसाठी नवे नियम असतील.

मुंबई  :- लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद असलेले देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळं, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. केवळ नॉन कंटेन्मेंट झोनमधीलच मॉल, धार्मिक स्थळं आणि हॉटेल सुरु केले जातील. नव्या नियमांनुसार प्रवेशासाठी टोकन यंत्रणेसारख्या व्यवस्था असेल. तर मंदिरांमध्ये प्रसाद दिला जाणार नाही. देशात 1 जूनपासून अनलॉक 1.0 सुरु झाला आहे, तर कन्मेंन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे.

अनलॉक 1.0 च्या या टप्प्यात धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल सुरु करता येणार आहे. परंतु प्रत्येक राज्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानुसार नियम जारी केले आहेत.

नुकतंच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये बरीचशी सूट देण्यात आली आहे.
द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील लोक, ज्यामध्ये गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोक यांनी कामावर जाने टाळावे. कार्यालयात काम करताना शारिरीक अंतर, स्वच्छता, सॅनिटायजेशन सारख्या सुविधा ठेवाव्यात. यासोबतच कार्यालयात थुंकताही येणार नाही.  
ऑफिस

  • ऑफिसच्या एन्ट्री गेटवर सॅनिटायजर डिस्पेंसर असणं आवश्यक असेल. तेथेच तापमान मोजण्याची सुविधा देखील असेल.
  • ज्यांना कोरोनाची लक्षणं नाही, त्यांनाच ऑफिसमध्ये येण्याची परवानगी असेल.
  • कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना याची कल्पना द्यावी लागेल.
  • संबंधित भाग कंटेनमेंट झोनमधून वगळला जात नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी नसेल.
  • गाडी चालकांना देखील शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं पालन करावं लागेल.
  • कार्यलयातील वरिष्ठ दळणवळणाची व्यवस्था करताना कंटेनमेंट झोनमधील चालक गाडी चालवणार नाही याची खबरदारी घेतील.
धार्मिक स्थळं

  • एन्ट्री गेटवर सॅनिटायजर डिस्पेंसर असणं आवश्यक असेल. तेथेच तापमान मोजण्याची सुविधा देखील असेल.
  • मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
  • पोस्टरच्या माध्यमातून लोकांना कोरोनाविषयी जागरुक केलं जाईल आणि ऑडियो-व्हिडीयो मेसेज देखील दिले जातील.
  • लोक आपले चप्पल-बूट आपल्या गाडीतच ठेवतील. आवश्यक असल्यास वेगळ्या स्लॉटमध्ये ठेवले जातील.
  • पार्किंग आणि मंदिर परिसरात शारीरिक अंतराचं पालन केलं जाईल.
  • आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन होईल.
रेस्टॉरन्ट

  • रेस्टॉरन्टमध्ये येणाऱ्यांना एकमेकांपासून 6 फूटाचं अंतर ठेवून बसावं लागेल.
  • विना मास्क कुणालाही रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश मिळणार नाही.
  • गाईडलाईननुसार रेस्टॉरन्टमध्ये वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जाऊ नये.
  • रेस्टॉरन्टमध्ये जितका वेळ थांबाल तितक्या वेळेत थोड्या वेळाने हात स्वच्छ करत राहणं आवश्यक असेल.
  • हात खराब नसतील तरी काही वेळेनंतर हात धुवावे लागतील.
  • रेस्टॉरन्टमधील कर्मचाऱ्यांना देखील हात आणि तोंड झाकूनच काम करावे लागेल.
  • शेफ असो की वेटर किंवा इतर कर्मचारी सर्वांना नियम पाळावे लागतील.
हॉटेल

  • हॉटलमध्ये येणाऱ्यांच्या प्रवासाची माहिती, मेडिकल कंडिशन याची माहिती घेण्यासाठी रिसेप्शनवर एक फॉर्म भरावा लागेल.
  • अधिकाधिक काम ऑनलाइन होईल.
  • ग्राहकांचं सामान नेण्याआधी त्याला निर्जंतुकीकरण केलं जाईल.
  • वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिलांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेतली जाईल.
  • हॉटलच्या रेस्टॉरंटमध्ये शारीरिक अंतराचे नियम पाळले जातील.
  • डिस्पोजलचा उपयोग करण्यावर भर दिला जाईल.
 त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च  'मिशन बिगिन अगेन' हे नवं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान