या पाच आरोग्याच्या मंत्रांपासून आरोग्यदायी राहता येते-प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

या पाच आरोग्याच्या मंत्रांपासून आरोग्यदायी राहता येते-प्रा. डॉ. रामकृष्ण बदने

   
मुखेड-आज कोराना नावाच्या आजाराने सगळे जग व्यापले आहे. जगातील अनेकांचा यामुळे बळी गेला आहे. यावर काही कोरोना योद्ध्यांनी मातही केली आहे. कोरोना पासून दूर राहण्यासाठी त्याची लक्षणे समजून घेऊन योग्य सामाजिक अंतर ठेवला व स्वच्छता बाळगली तर हा आजार आपल्याकडे येणार नाही. दुर्दैवाने किंवा निष्काळजीपणामुळे हा आजार झालाच तर त्यावर विजय मिळविण्यासाठी आपण निरोगी असणे गरजेचे आहे. हे आरोग्य आपणास आरोग्यासाठी HEALTH या शब्दाच्या विग्रहातुन या पाच आरोग्याच्या मंत्रापासून मिळू शकतो असे प्रतिपादन प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी. नांदेड येथील आय.क्यू.ए.सी.विभागाकडून आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार मध्ये कोरोना काळातील मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर बोलताना केले.
    ते पुढे म्हणाले की HEALTH मधील H म्हणजे Habit म्हणजेच सवय आपणास चांगल्या सवयी असाव्यात, E-म्हणजे Exercise म्हणजेच व्यायाम नियमित व्यायाम करावा,A- म्हणजे Attitudeम्हणजे दृष्टिकोण आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असावा.L म्हणजे Love  प्रेम देणे व प्रेम घेणे, T म्हणजे Tension Free Life  तणावमुक्त जीवन जगणे आणि शेवटी H म्हणजे Happy Mindआनंदी मन यासाठी हे पाच मंत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. वरील पाच मंत्रांचा वापर जर आपण आपल्या आयुष्यात केला तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील व आपली Immunity वाढून या आजारावर आपणास विजय प्राप्त करता येईल.
     या वेबीनारचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी केले. यावेळी ते म्हणाले की लाॅकडाऊनमुळे आपण हा आजार प्रसार होण्यापासून बऱ्याच अंशी नीयंत्रीत केला आहे.निसर्गात प्रदूषण ही कमी झालेले दिसत आहे .अनेक जण या काळात अन्य आजारामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. या आजाराला घाबरून काही जणांनी आत्महत्या केल्याच्या ही बातम्या वाचल्या त्या वाचून मनाला वेदना ही झाल्या. आपण या आजाराची भीती न बाळगता या आजाराला व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे.  आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. ती कशी वाढवावी या विषयाची जागृती निर्माण व्हावी या उद्देशानेच  या  वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 
    या वेबिनारचे सूत्रसंचलन व आभार आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा. बळीराम राठोड यांनी केले. वेबिनार यशस्वी करण्यासाठी संगणकशास्त्र प्रमुख प्रा. संजय पाटील, प्रा. गोविंद पांडे व आय.क्यू.ए.सी.च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.या वेबिनार मध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व अन्य क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला.

Comments

  1. अतिशय उपयुक्त व्याख्यान .. बदने सर अभिनंदन
    बी. सी. राठोड,संजय पाटील, गोविंद पांडे यांनी मेहनतीने आयोजन केले.. अभिनंदन...।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान