नांदेड गुरुवारी सात नवीन पॉझिटिव्ह ! बाधित रुग्ण संख्या १८२ वर

गुरुवारी सात नवीन पॉझिटिव्ह ! बाधित रुग्ण संख्या १८२ वर


मुखेड / प्रतिनिधी बल्खी आसद

नांदेड: आज प्राप्त अहवालानुसार 69 पैकी 47 अहवाल निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह आढळले आहेत.  2 अहवाल अनिर्णित आले असून 4 अहवाल नाकारले आहेत. आणखी 70 अहवाल प्रलंबित आहेत.  नांदेड जिल्ह्यातील बाधितांची संख्या 182 वर पोहोचली आहे.

आज 7 नवीन रूग्ण आढळले असून हे नई आबादीतील 5 रुग्ण तर 2 नवीन रूग्ण हे पहिलं रूग्ण उमरखेड येथील रहिवासी असून दुसरा नवीन रूग्ण औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्याची माहिती मिळाली आहे. नई आबादी येथील बाधित कामगार रुग्णाशी संपर्कातील नातेवाईक त्यांच्या संपर्कातून संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

आजचे 69 पैकी 47 अहवाल निगेटिव्ह तर 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नांदेड  जिल्ह्यातील बाधीत व्यक्तींची संख्या 182 वर पोहचली आहे. आतापर्यंत 126 रुग्ण आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेडकरांना आणखी 70 अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.


नागरिकांना आवाहन:
  • * स्वतः ची व इतरांची काळजी घ्या.
  • * अत्यावश्यक कामाशिवाय  बाहेर निघू नका.
  • * मास्क वापरा आणि डोकेदेखील दुहेरी आवरणाच्या कापडाने झाकून ठेवा.
  • * सैनीटायझरचा वापर करा.
  • * वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा.
  • * १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता आणि आजारग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.
  • * दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राखावे.
  • * गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
  • * प्रवास शक्यतो टाळावा.
  • * प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अन्न, फळे व पेयाचे सेवन करावे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान