केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी:- नांदेड शहर ,जिल्हा काँग्रेस कमिटी

 केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी


पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना घातले काँग्रेसने साकडे

नांदेड:-  कोरोनाच्या महामारीने देशात हाहःकार माजविला असताना सामान्य माणसांना आधार देण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या संबंधिचे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन राष्ट्रपतींना या संदर्भात साकडे घातले आहे.
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना एक निवेदन दिले. हे निवेदन देशाचे राष्ट्रपती यांना संबोधित करुन तयार करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्र्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात यावे अशी विनंती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना यावेळी केली.
त्यानंतर याच आशयाचे निवेदन 5 जणांचा समावेश असलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना दिले.यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देताना उपरोक्त पदाधिकार्‍यांसह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बी.आर.कदम, जि.प.चे कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलिप पा.बेटमोगरेकर, ओ.बी.सी.चे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सुरेंद्र घोडजकर,बाजार समिती सभापती संभाजी पुयड,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, प्रफुल्ल सावंत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, नारायण श्रीमनवार,श्रीराम पाटील,बापूराव गजभारे, दयानंद वाघमारे, संतोष मुळे, मागासवर्गीय जिल्हा सेलचे अध्यक्ष गंगाधर सोंडारे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, प्रदेश पदाधिकारी डॉ.रेखा चव्हाण, प्रकाशकौर खालसा, शिल्पा नरवाडे, हरविंदरसिंघ संधू, प्रमोद भुरेवार, उमाकांत पवार, सुमित मुथा,श्रीनिवास जाधव, सुरेश हाटकर,श्री हजारी, सुभाष पाटील आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान