रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वतीने बाराहाळी सर्कल मधील गरजु गोरगरीबांना राशन किट वाटप
प्रतिनिधि:- बल्खी आसद.
मुखेड: सध्या कोरोना विषाणूचा देशात वाढता प्रदूर्भाव पाहता देशात लॉकडाउन करण्यात आले , या लॉकडाउन मध्ये उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून बाराहाळी सर्कल मधील वळंकी येथील परिसरात दि.3 जुन रोजी रामदास पाटील सुमठाणकर मित्रमंडळाच्या वतीने गोरगरीबांना धान्य वाटपाचे 60 किट वाटप करण्यात आले...
सामाजिक बांधिलकी आणि मदतीची भावना यांच्या संगमातून रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा ही मोठी मोहीम हाती घेऊन वळंकी गावातील परिसरात या धान्य किट वाटप करण्यात आल्या.गेल्या लॉकडाउन लागल्यापासून सतत मुखेड तालुक्यात गोरगरीबांना अपंग,विधवा,निराधार प्रत्येक गरजु नागरीकांच्या घरी जाऊन तिथल्या गरजू लोकांपर्यंत रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वतीने छोटीशी मदत पोचवण्याच कार्य माधव गोजेगावे तसेच सिद्दु भाऊ डोंगळे यांच्या वतीने केले आहे...
यावेळी सिद्दु भाऊ चंद्रशेखर पाटील डोंगळे,माधव गोजेगावे, हानमंत भायकाटे,पत्रकार पवन कँदरकुंठे,राजीव भुषणवाड, शिवसागर कँदरकुंठे,नरसिंग भुमणवाड,प्रकाश व्हनलवाड,नरसिंग गुडमे, यांच्यासह अनेक मित्र परिवार उपस्थित होते...

Comments
Post a Comment