कोरोनाचा काळात आहेर रुपी फेरोज शेख यांनी दिला वधू वरांना मास्क व सॅनिटायझर भेट

कोरोनाचा काळात आहेर रुपी फेरोज शेख यांनी दिला वधू वरांना मास्क व सॅनिटायझर भेट

बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

कोरोना या संसर्गजन्य आजारांपासून बचाव  करण्यासाठी नायगाव तालुक्यातील नरसी येथे इरफान मदारसाब बेग यांच्या लग्न सोहळ्याप्रसंगी शेख फेरोज बाबुसाब यांनी वधु वरांना चक्क आहेर रुपी मास्क व  सॅनिटायझरची भेट दिली.
जगासह देशात सुद्धा कोरोना या महामारीने संपूर्ण मानवजातीवर हल्ला केला असून याला प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू केला आहे.या लॉकडाऊनमुळे  अनेक ठिकाणी लग्न सोहळा रद्द करणे किंवा पुढे ढकलले जात आहेत.मात्र शासनाने लग्न समारंभासाठी काही प्रमाणात सवलत दिल्याने अनेकांचे लग्न शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन एकदम साध्या पध्दतीने पार पाडले जात आहे.असाच एक लग्न सोहळा नायगाव तालुक्यातील नरसी येथे पार पडला आहे.त्यातच आहेर ही समाजात मित्र परिवाच्या व नातेवाईकांचा लग्नसोहळ्यात द्यावयाची भेट वस्तू मानली जाते.मात्र मित्राचे लग्न कोरोनाचा सावटाखाली आल्याने अगदी जवळच्या नातेवाईकांचा किंवा मित्राच्या लग्नाला एक भेट वस्तू म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेर रुपी गिफ्ट देतात.मात्र नेहमीच चर्चेत असणारे फेरोज बाबुसाब शेख यांनी आपल्या मित्राचे लग्न कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितत आल्याने व त्यांची कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून बचाव करण्यासाठी व समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी थेट मास्क व सॅनिटायझरचीच भेट दिल्याने परिसरात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची नायगाव तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान