नांदेड जिल्हातील ता.बि.गु.केंद्र ( ता.फ.रो.वा. / टी.सी.डी.मंजूराचे विविध मागण्यास मुखेड येथे बेमुदत उपोषण सुरु
नांदेड जिल्हातील ता.बि.गु.केंद्र ( ता.फ.रो.वा. / टी.सी.डी.मंजूराचे विविध मागण्यास मुखेड येथे बेमुदत उपोषण सुरु
मंजूराचे मागण्या खालील प्रामणे
१ ) राज्यात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले आहे . आम्हा सर्वांचे प्राण उपास मारीमुळे संकटात सापडले आहे अशा कठीण वेळी वरील मंजुराचा १० ते २३ महिन्याचा पगार तात्काळ वाटप करावा व उधारी कामे घेण्याची पध्दत बंद करावी
२ ) रिट याचिका १५२२१/२०१७ मधील ५३ मंजुरांना मा . उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दि .४ जुलै २०१ ९ रोजी मंजुराच्या बाजूने निकाल दिला असून ५३ मजूरांना ग्रेड १ मजुर पदावर ४ महिन्याच्या आत शासकिय सेवेत नियुक्ती करण्याचे आदेश दिला आहे . दुर्देवाने या प्रकरणात आपल्याकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे . या गोष्टीस सहाय्यक प्रशाासन अधिकारी जबाबदार आहेत वया बाबतचे मुळ प्रमाणपत्र मंजुरांना परत करण्यासाठी आम्हा सर्वांना हेलपाटे मारणे भाग पाडले . आता आम्हा मजुरांना हक्काचे मंजूरासाठी तयार केलेली सेवा जेष्ठता यादी आम्हाला प्रशासन अधिकारी देण्याची टाळाटाळ करीत आहेत . दि.८-०६-२०२० सोमवार आमचे प्रतिनिधी श्री व्यंकट इंगळे यांना जेष्ठता यादी देतो म्हणून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत त्यांच्या दालनासमोर ताटकळत उभे ठेवले आश्चयांचे गोष्ट म्हणजे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री चलवदे साहेब यांनी सदरची यादी देण्यास स.प्रशासन यांना सांगितले होते . सहाय्यक प्रशासन यांनी याचीका का मजुरांना विनाकारण त्रास देण्याची पध्दत बंद करावी व वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करावे तसेच शासनाकडे पाठवलेल्या ५३ याचिका कर्त्यांची व ५३ मंजूराची सेवेत कायम करण्याची यादीची प्रत देण्यात यावी .
३ ) दि .२ ९ ऑगष्ट २०१ ९ रोजी मा.सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांनी सतत सुनावणी घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले व दि .८ ऑगष्ट २०१४ च्या शासकिय अधिसुचनेची अंमल बजावणी करावी व त्याप्रमाणे विशेष भत्यासहीत मजुरांना किमान वेतन प्रतिदीन रु .२४० / -देण्याचे आदेशित केले होते . सुनावणीच्या खात्याच्या उपस्थीत अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते .
राज्यात ठिकाणी इतर ठिकाणी विशेष भत्ता दिला जातो. पण येथे मात्र दिला जात नाही.ही तिव्र संतापाची बाब आहे . नुकतचे केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे दर प्रति २३८ / - रु . घोषित केला आहे . त्या हिशोबाने आम्हा मजुरांना किमान वेतन देण्यात यावे व त्या सोबत विशेष भत्ता देण्यात यावा . वरील मागण्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांना योग्य ती समज देवून निदान यापूढे तरी आमची आडवणुक होणार नाही याची काळजी घ्यावी . अशी मागणी १ ) श्री बळवंत किशन मोरे २ ) श्री व्यंकट हैबती इंगळे ( ता.बि.कें . कासराळी ता.बिलोली ) ३ ) सय्यद अब्दूल मोहमद ( ता.बि.के.मुंड ) ४ ) संजय सखाराम भुमावाड ( ता.फळवाटीका भोकर ) ५ ) पिराजी कोंडीबा वडजे ( टी.सी.डी. रातोळी ता.नायगाव ) ६ ) श्री बळीराम विठ्ठल चंद्रवंशी ( ता.बि.के.मनाठा ता.हदगाव ) यांनी मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड़ यांच्याकड़े केलेली आहे

Comments
Post a Comment