मुखेड पं.स. शिक्षण विभागातील श्रीमती एस.ए. पठाण यांना निरोप

मुखेड पं.स. शिक्षण विभागातील श्रीमती एस.ए. पठाण यांना निरोप

मुखेड / प्रतिनिधी बल्खी आसद

गटशिक्षणाधिकारी कार्यालय मुखेड येथे कार्यरत असलेल्या अधीक्षक श्रीमती सैफुनीसा पठाण या आपल्या सेवेची 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्या त्यामुळे गट साधन केंद्र शिक्षण विभाग मुखेडच्या वतीने यथोचित सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

निरोप समारंभ प्रसंगी सत्कार करताना सहकारी कर्मचारी
सदर छोटेखानी कार्यक्रमात सोशल डिस्टशनचे पालन करण्यात आले. श्रिमती एस.ए. पठाण ह्या आपल्या संपूर्ण सेवाकाळात अतिशय नम्र व प्रमाणिक कर्मचारी म्हणून त्यांनी शिक्षक, कर्मचाऱ्यांत नावलौकिक कमावला आहे. या निरोप समारभं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी राम भारती गोलेगावकर हे होते तर शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जंपलवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे,यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी केंद्रप्रमुख गजानन होनराव, व्यंकटराव माकने, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस दिलीप देवकांबळे, तालुका अध्यक्ष शिवाजी कराळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एन.एस.गायकवाड, दिलीप देवकते, होनाजी जायेभाये, राजकुमार पंदर्गे, सायलू करेवाड, श्रीपत वाडीकर, व्ही.एस.पाटील, अंजली गायकवाड, शिराज मुजावर, पत्रकार महेताब शेख, दिनेश आपटे, गणेश राचुटकर, अशोक चव्हाण, सूर्यकांत काबळे यांच्यासह तालुक्यातील अनेक केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान