नांदेडमध्ये दोघा चिमुकल्यांना कोरोना पॉझिटिव्ह
नांदेडमध्ये दोघा चिमुकल्यांना कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधि:- बल्खी आसद
नांदेड : मंगळवारी सकाळी ५२ अहवाल प्राप्त झाले . यातील ४७ अहवाल निगेटीव्ह असले तरी लोहार गल्लीतील बाधित वृद्ध दाम्पत्याच्या संपर्कातून बाधा झाल्याने दोन बालके पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे . उर्वरीत तीन अहवाल अनिर्णित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले . बाधा झालेल्या दोन बालकांमध्ये एक 7 वर्षाची मुलगी आहे तर दूसरा मुलगा अवघा 4 वर्षाचा आहे . दरम्यान या नव्या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकूण संख्या १५१ एवढी झाली आहे . यातील १२० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे . तर २३ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत . उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने ८ बाधीतांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू
नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य
करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन
घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप
सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment