सावरगाव - सांगवी रोडवर अपघात ; एकाचा मृत्यू
- सावरगाव - सांगवी रोडवर अपघात ; एकाचा मृत्यू
- बोलेरोने उडविले युवकास
सावरगांँव प्रतिनिधि- शेख चाँदपाशा
मुखेड तालुक्यातील सावरगाव पि - सांगवी रोड वर
युवकास बोलेरो गाडीने धडक दिल्याने युवकाच मृत्यू झाल्याची घटना दि 03 रोजी घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य महामार्ग वरील गाव असलेले सावरगाव येथील युवक मन्मथ अंकुश सूर्यवंशी वय 22 वर्ष दि 03 रोजी सांयकाळी अंदाजे आठ वाजता आपल्या मित्रांसोबत सांगवी रोडवर फिरायला (व्यायाम साठी) गेला होता . फिरत असताना अचानक भरधाव वेगाने बोलेरो MH -13 BN - 4941 ही गाडी मागून येऊन जबर धडक दिली.त्या धडकेत मन्मथ सूर्यवंशी जागेवर कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपजिल्हा रुग्णालय मुखेड आणले असता डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान मरण पावला.
बोलेरो गाडीच्या वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले प्रत्यक्षदर्शीने वाहनचालक दारु पिऊन असल्याचे सांगितले आहे. मयतास उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले असून त्याचे दि 04 रोजी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई , वडील , बहीण , भाऊ असा परिवार आहे. घरातील हाताला आलेला मुलगा गेल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मन्मथ ला आर्मी मध्ये जाण्याची ईच्छा होती. त्यामुळे तो रोज व्यायाम करत असे. यामुळे त्याने आपले शरीर सुद्धा धष्टपुष्ट ठेवले होते. पण नियतीला हे मंजूर नव्हते आणि काळाचा अचानक आघात झाला आणि होत्याचे नव्हते

Comments
Post a Comment