नांदेड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडला खिंडार; अनेक युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


नांदेड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडला खिंडार; अनेक युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


संभाजी ब्रिगेड मुखेड विधानसभा लढवलेले उमेदवार राष्ट्रवादी पक्षात

नांदेड दि.१० जून:  जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारनात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असणारे, सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुका वेळी अख्खा जिल्हा पिंजून काढणारे संभाजी ब्रिगेडचे शिलेदार. बालाजी पाटील सांगवीकर ता.अध्यक्ष मुखेड व गजानन पाटील होटाळकर ता.अध्यक्ष नायगाव,  दत्ता पाटील इंगोले विधानसभा अध्यक्ष मुखेड,  रमाकांत पाटील जाहुरकर युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष मुखेड,  प्रेषित पाटील सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख मुखेड,  निळकंठ पाटील चांडोळकर संभाजी ब्रिगेड ता.उपाध्यक्ष,  निळकंठ पाटील बेळीकर संभाजी ब्रिगेड ता.कार्याध्यक्ष,  चक्रधर पाटील कोंडलापुरकर संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष,  प्रदुम पाटील चिंचाळकर विधान सभा उपाध्यक्ष देगलूर बिलोली,  अनसाजी पाटील जिगळेकर विधान सभा अध्यक्ष नायगाव धर्माबाद उमरी, सुशिल पाटील पवार संभाजी ब्रिगेड ता.उपाध्यक्ष नायगाव यांनी आपल्या असंख्य सहकार्यां सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिना चे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष व प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डाॅ. सुनील कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी उपस्थित कल्पना ताई डोंगळीकर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्या , प्रांजली ताई रावणगावकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा, वसंत पाटील सुगावे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भास्कर दादा भिलवंडे ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नायगाव व ईतराच्या उपस्थित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

जिल्ह्यात अडगळीला पडलेल्या राष्ट्रवादीला आता नव्याने उभारी द्यायचं काम आता खऱ्या अर्थाने होईल अशी आशा  जिल्ह्यात राष्ट्रवादी व शरद पवार साहेबा वर प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनात आहे..!

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान