मलासंपत्ती पेक्षाप्रजेचे स्वास्थ्य जास्त प्रीय_आहे नशामुक्त राज्याचे संस्थापक स्वातंत्रविर टिपू_सुलतान

मलासंपत्ती पेक्षाप्रजेचे स्वास्थ्य जास्तप्रीय_आहे  नशामुक्त राज्याचे संस्थापक स्वातंत्रविर टिपू_सुलतान
टिपू सुलतान यांना इंग्रजा विरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ओळखले जाते...

परंतू टिपू सुलतान हे उत्तम शासक ,असामान्य योद्धा तर होतेच त्याच बरोबर टिपू सुलतान हे वैद्यानिक,समाज उद्धारक,तत्व वेत्ते,संशोधक,भूगर्भ शास्त्रज्ञ,यांत्रीकी अभियंता,यशस्वी उद्योजक,साहित्यिक,युद्ध व्यवस्थापन तज्ञ,कृषी विकासक ईत्यादी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे एकमेव अष्टपैलू व्यक्तिगत होय.... नशामुक्त राज्याचे संस्थापक टिपू सुलतान टिपू सुलतान प्रजेच्या स्वास्थ्याची फार काळजी घेत असत...टिपू सुलतान ने राज्यात गांजा, आफीम च्या शेतीवर व दारूच्या व्यापारावर सक्तीने बंदी केली होती...दारू विकणार्याला त्याचे हात कलम करण्यापर्यंत शिक्षा देण्यात येऊ लागली... अफीम,गांजा,चरस यांचा व्यापार करणार्यास कठोर (जुर्माना) दंड ठोठावण्यात येई.. टिपू सुलतान चा प्रधानाने जेव्हा चरस ,गांजा,अफीम,दारू,च्या व्यापाराने जमा होणार्या टॅक्स च्या रकमेची कमीकडे टिपू सुलतान चे लक्ष वेधले तेव्हा टिपू सुलतान ने प्रधानाला पत्र लिहून सांगीतले मला संपत्ती हून जास्त रयतेचे स्वास्थ्य जास्त प्रीय आहे आणि सक्त शब्दात सुनावले काय आम्हाला आमच्या खजाण्याचा नफा प्रजेच्या स्वास्थ्य हून जास्त प्रीय आहे? खरच रयतेच्या स्वास्थ्याची आपल्या मुला बाळा प्रमाणे काळजी टिपू सुलतान घेत होता... टिपू सुलतान ला मेडिकल सायंस (वैद्यकीय विज्ञान) मध्ये तज्ञ होता ....आपल्या सैनिकी अधीकार्यांना आजादी असताना उपचार कोणता करावा हे टिपू सुलतान सांगत असल्याचे त्यांच्या विविध पत्रातून कळते... टिपू सुलतान ने राज्याला नशामुक्त करण्यासाठी नशेमुळे शरीरावर होणारे परिणाम यासंबंधी माहीती देणारे फरमाणच काढले होते..व या फरमानाद्वारे तंबाखू खाण्याने शरीरावर होणारे 6 नुकसान सांगितले....
1) ह्रदय काळ पडते... 2)ओठ आणि जिभ काळी पडते 3)तोंडात घास वास येतो (दुर्गंधी येते) 4)भूक लागत नाही 5)डोळ्याच्या प्रकाशावर परीणाम होतो... 6)शारीरीक स्वास्थ्य खालावते.
. या मुळे तंबाखू चे सेवन राज्यात वर्ज्य करण्यात आले आहे... जर आपण चाईल्ड लाईन इंडिया फाऊंडेशन चे 2014 सर्वेक्षण पाहीले तर देशातील नशा करणार्या युवका मध्ये 65% ते युवक आहेत जे 18 वर्षांखालील आहेत.. सरकारी आकड्यानुसार देशातील 75% जनता ही कोणत्या न कोणत्या प्रकारे नशा करीत आहे.. आज भारतात दरवर्षी 9 लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत.. दर 10 मधला एक मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होत आहे ..आणि जगात भारत तंबाखू सेवनामुळे करणार्या देशात दुसर्या स्थानावर आहे.. येणार्या काळात भारतातील युवा शक्ती वाचवायची असेल तर आपल्याला टिपू सुलतान चे नशामुक्त राष्ट्र चे धोरण स्वीकारून सर्व प्रकारच्या नशेवर सक्तीची बंदी आणने आवश्यक आहे.. देशातील युवकांच्या कींवे रयतेच्या जिवाशी खेळून कसले उत्पन्न कमावणार? हा तर लोकशाहीची थट्टाच..... कृषी विकासक शेतकर्यांचे कैवारी टिपू सुलतान शेतकर्यांना शेतीसाठी पाणी नेहमी उपलब्ध रहावे उद्देशाने टिपू सुलतान यांनी कावेरी नदीवर मही नावाच्या धरणाची पायाभरणी केली होती.... 1911 मध्ये तेथे खोदकाम करताना तेथे एक शिलालेख सापडला ..वास्तविक ती एक कोनशिला होती .त्याचे अनावरन टिपू सुलतान च्या हस्ते झाले होते ...त्यावर महत्वपूर्ण माहीती नोंदविली होती.. सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टिपू सुलतान ने येथे एका धरणाचा शिलान्यास केला होता .या धरणाच्या पाण्याने जो शेतकरी शेती करेल त्याला 1/4 महसूल ईश्वराच्या सन्मार्गात माफ करण्याची घोषणा ही करण्यात आली होती .. आणि जो पर्यंत शेतकरी तेथे शेती करतील ती शेती तो पर्यंत शेतकर्यांच्या वंशाजाच्या ताब्यात राहील जो पर्यंत धरती आणि आकाश आहे आणि जो कोणी शेतकर्यांच्या जमिनी त्यांच्या कडून हीसकावण्याचा प्रयत्न करीन कींवा या कार्यात आडकाठी आणेल तो फक्त शेतकर्यांचाच शत्रू नाही तर सर्व मानव जातीचा शत्रू समजला जाईल... या शिला लेखावरुन टिपू सुलतान चे शेतकर्यावरील प्रेम दिसून येते.... येथे भूमि अधीग्रहन कायदा आणून शेतकर्यांच्या पारंपारिक मालकीची शेती सरकार भांडवलदाराच्या घशात देऊ करीत आहे तर टिपू सुलतान सरकारी जमीन शेतकर्यांना मोफत शेती करण्यासाठी ही देत आहे ..वरून 1/4 महसूल ही माफ करीत आहे...आणी सरकारी शेतीची जागा शेतकर्यांच्या वंशजाच्या ताब्यात नेहमी साठी देऊन ..शेतकर्यांची शेती बळकावण्याचा प्रयत्न करणार्याला कींवा शेतकर्यांचे शोषण करणार्याला मानव जातीचा शत्रू म्हणत आहे.... आज स्वंतत्र भारतात 3.5 लाख हुन जास्त शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत... इतकी वाईट अवस्था शेतकर्यावर कधी आली नाही को शेतकर्याला आपली व्यथा मांडण्यासाठी नंतर मंतर वर आपले मूत्र प्यावे लागले..... टिपू सुलतान च्या राज्यात शेतकरी राजा होता... टिपू सुलतान ने शेती पूरक उद्योग सुरू केले .. जहागीरदारी संपवली व कर्मचारी नेमले... शेतकर्यासाठी शेती जोड व्यवसाय म्हणून रेशम उद्योगास चालना दीली... रेशम निर्मीतीसाठी कोडे पाळणयाकरीता 21 केंद्रे स्थापन केली..4 मोठ्या प्रयोग शाळा निर्माण केल्या..त्या प्रयोग शाळांना लालबाग असे म्हंटले जायचे..लालबाग मध्ये अमेरीका ,युरोप येथून राज्यात कित्येक तलाव,बंधारे,नेल्याची दुरूस्ती केली.गरीब शेतकर्यांना बी व औजारांच्या स्वरूपात बिन व्याजी कर्ज दीले.... शेतकर्यांच्या उत्पादनांवर प्रक्रीया करून पक्का माल तयार केला जात होता त्यामुळे शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मीळत असे... टिपू ने शेती धोरणाला राज्याच्या व्यापाराशी जोडले म्हणून शेतकरी अंतत्य सुखी होता... कर्नल लिटल हा इंग्रज अधिकारी म्हणतो टिपूच्या कृषी धोरना मुळे तो प्रभावीत झाला..तो आपल्या पुस्तकात लिहतो ..संपूर्ण म्हैसूर मध्ये शांतीची स्थिती खुपच चांगली होती ...राज्यात कुठेच नापीक व पडीत जमीन दीसत नाही... टिपू सुलतान म्हणतात शेती ही देशाची टिपू सुलतान म्हणतात शेती ही राष्ट्राची रक्त वाहीणी आहे..ज्या श्रमाने रक्त वाहीणी शरीराला रक्त पुरवून जिवंत ठेवते त्याप्रमाणे शेती अन्न निर्माण करून देशाला जिवंत ठेवते आज खरच टिपू सुलतान च्या सामाजिक आणि कृषी धोरणाची देशाला गरज आहे... देशाला पाश्चात्यांच्या लाचारी पासून वाचवण्यासाठी टिपू सुलतान ने व्यापार ,उद्योगाला चालना दीली राज्यात विविध वस्तू निर्मीतीचे कारखाने उभारले ..आंतर राष्ट्रीय स्तरावर व्यापार नेले... टिपू सुलतान हे धर्म सहिष्णू राजे होते.. त्यांनी 156 मंदीरांना देणग्या दिल्याचे पुरावा आज ही मैसुर गैझेटीयर मध्ये उपलब्ध आहे.. टिपू सुलतान बद्दल महात्मा गांधी यंग इंडियाच्या 23 जानेवारी 1930 च्या अंकात म्हणतात टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या 4 ही बाजुने श्रीवेंकटरमना ,श्रीनिवास,श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते...
(सरफराज शेख लिखीत सल्तनत ए खुदादात मध्ये अधीक तपशीलवार माहीती आहे कृपया वाचकांनी हे पुस्तक अवश्य घ्यावे) अशा प्रकारे टिपू सुलतान हे फक्त राजे नसुन राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक एकात्मतेची प्रेरणा व देशाला सुपर पावर बनवणारी विचार धारा आहे..
शेख सुभान अली अध्यक्ष दंगामुक्त महाराष्ट्र अभियान 9511222211


Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान