मुखेड तालुक्यासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन एसएफआय चे राज्यव्यापी आंदोलन!

मुखेड तालुक्यासह  विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन एसएफआय चे राज्यव्यापी आंदोलन!

२ जून रोजी सामाजिक न्याय मंत्री यांना SMS पाठवा आणि ट्विटर मोहिमेत सामीलचे  अव्हान !

मुखेड / प्रतिनिधि:- बल्खी आसद

संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या महारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅक डाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे.ग्रामीण भागातील गोर गरीब,शेतकरी,कष्टकरीच्या मुलांचे शिक्षण प्रणाली ढसाळलेली दिसून येत आहे गेल्या काही महिन्या पासुन गोर गरीब,शेतकरी,कष्टकरीच्या हाताला काम नाही कराव तर पोटाची खळगी भराव या परिस्तिथि मद्दे मुलाचे शिक्षण त्यांवर होणारा खर्च कुठुन आनाव सावकाराकडे जमीन गिरवी ठेवाव काय अशी व्यथा ऐकायला मिळत आहे ज्याच्या मूलाचे आई वडील धनवान आहेत ते आपले शिक्षण घरी बसुन कंप्यूटर लॅपटॉप द्वारे ऑनलाइन
घेत आहे मग गरीब कष्टकराच्या मुलांनी  शिक्षण  घेयाच कस मग यान कडे लक्ष कोण द्यावे म्हणुन एसएफआय ने राज्यव्यापी आंदोलन छेडलेला आहे तरी शासनाने तात्काळ खालील मागण्या पूर्ण करावे यासाठी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर मुखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी एसएफआयचे जिल्हा अध्य्क्ष विजय लोहबंदे, DYFI चे जिल्हा अध्यक्ष सुधाकर अबुलगेकर,माजी जिल्हा अध्यक्ष जयपाल शिरसाठे,जिल्हा सचिव मंडळ सदस्य रत्नदीप सोनकांबले, शंकर बादावाड,मुखेड ता.अध्यक्ष अमोल सोनकांबळे आदीनी लॉकडाउनचे तंतोतंत पालन करुन  खालील मागण्या मान्य केला पाहिजे अशी विनंती सरकारला केली आहे
मागण्या :-
(१) विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा.
(२) विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करा.
(३) 'सारथी' संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ फेलोशिपचे पैसे जमा करा
(४) 'BARTI' च्या ३०८ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा.
(५) 'स्वयम' योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
(६) शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करा. 



Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान