डॉ.शितल दत्तात्रय कुरुडे यांच्यावतीने बहादरपुरा ग्रामपंचायत येथे आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

डॉ.शितल दत्तात्रय कुरुडे यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम 30  होमिओपॅथिक गोळ्यांचे  वाटप

मुखेड / प्रतिनिधि:- बल्खी आसद


बहादरपुरा ग्रामपंचायत  येथील डॉ.शितल दत्तात्रय कुरुडे यांनी आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या मोफत कोणतेही पैसे न घेता गरीब गरजू लोकांना मोफत वाटप केले आहे. जगात कोरोना विषाणूने हाहाकार घातलेला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे अशा परिस्थितीत बहादरपुरा ग्रामपंचायतच येथील मा दत्तात्रय कुरुडे यांची कन्या डॉ.शितल दत्तात्रय कुरुडे यांनी मोठा मदतीचा हात म्हणून गोरगरीब असलेल्या गावकरीना ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करून कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती  केलेली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे  वाटप केले.
       आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप स्थनिक संस्था आणि  राजकारण्यांकडून केले जात आहे.
यावेळी शेकापचे माजी आमदार भाई गुरुनाथ रावजी कुरुडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संजीवनी कुरुडे ,सरपंच माधव पेटकर,उपसरपंच गुरुनाथ पेटकर,उत्तम भांगे,आशा वर्कर,आंगनवाडी सेविका  हे उपस्थित होते. अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे वाटप केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने डॉ.शितल दत्तात्रय कुरुडे यांचे आभार व कौतुक होत आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान