कोविड-19 वर संशोधन करण्यासाठी मानव जातीच्या प्रयोगासाठी नांदेड ता.मुखेड चा 'हा' भूमिपुत्र स्वेच्छेने तयार; मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र |

कोविड-19 वर संशोधन करण्यासाठी मानव जातीच्या प्रयोगासाठी नांदेड ता.मुखेड चा 'हा' भूमिपुत्र स्वेच्छेने तयार; मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र |

मुखेड / प्रतिनिधी बल्खी आसद

'कोरोना विषाणू कोविड-19 यावर संशोधन करण्यासाठी मानव जातीच्या देहाची आवश्यकता असल्यास मी स्वतः त्या प्रयोगासाठी स्वेच्छेने तयार आहे' असे नारायण गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.



नांदेड - : जगभरात सध्या कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सर्वच स्तरांतून कोरोना विरोधातील लढ्यात योगदान दिले जात आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि संशोधक आपले प्रयत्न कसे यशस्वी होतील, यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत.


यातच कोरोना लसीचा प्रयोग करण्यासाठी आपले शरीर देण्याची तयारी नांदेडमधील एका व्यक्तीने दाखवली आहे. मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील नारायण गायकवाड यांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिले आहे. कोरोना लस चाचणीसाठी नांदेडमधील नागरिक स्वेच्छेन तयार झाले आहेत.

कोरोना विषाणू या महामारीने आजवर अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या तरी औषधाची तसेच लसीकरणाची नितांत आवश्यकता आहे. विविध देशातील अनेक वैज्ञानिक या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते औषधोपचार तसेच लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहे. मात्र, जर कोरोनाची लस तयार झाली असेल अथवा होत असेल आणि अशावेळी याचा प्रयोग करण्यासाठी मानव देहाची गरज असेल, तर 'जगाच्या कल्याणासाठी आपण हा धोका पत्करायला तयार असल्याचे' नारायण गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील नारायण काळबा गायकवाड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी तत्काळ लस विकसित करण्याचे संशोधन काम हाती घेण्यात आले आहे. यात संशोधन प्रकल्पासाठी पुणे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला मानवाची किंवा माकडाची गरज आहे, असे मी एका वर्तमानपत्रातील बातमीत वाचले आहे. या बातमीच्या आधारे मी स्वतःवर या लसीचा प्रयोग करण्यासाठी शासनाला माझे शरीर देण्यास तयार आहे,' असे नारायण गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान