15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन? खरं आहे की खोटं जाणून घ्या |

15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन? खरं आहे की खोटं जाणून घ्या सध्या

सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून सरकारच्या वतीनं आता अनलॉक 1.0 ही सुरू करण्यात आला आहे.
नवी दिल्ली, 11 जून : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून सरकारच्या वतीनं आता अनलॉक 1.0 ही सुरू करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर देशात 15 जूननंतर पूर्ण संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 15 जूननंतर गृह मंत्रालयाच्या वतीनं अनलॉक़ 1.0 हटवत पुन्हा कडक नियम लागू करण्यात येणार असल्याचं म्हंटलं आहे.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज फेक असल्याचं फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. पीआयबीनं हा मेसेज फेक असून 15 जूननंतर लॉकडाऊन 6.0 बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. सध्या अनलॉक अंतर्गत हॉटेल, मॉल्स, बससेवा, धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आली आहे.                    
 
याआधी सरकारच्या वतीनं 30 जूनपर्यंत कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आता केवळ रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन असे केवळ दोन विभागणी करण्यात आली आहे. यात कन्टेन्मेंट झोनमध्ये तीन टप्प्यांमध्ये काही सवलती देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळं, हॉटेल, मॉल्स यांना परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्स खुले करण्यात आले असले तरी, ग्राहकांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे.


सध्या दुसऱ्या टप्प्याचा विचार केला जात आहे. या टप्प्यात शाळा, कॉलेज, क्लासेस सुरू करण्यावर विचार केला जात आहे. 15 ऑगस्टनंतर सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरू करण्याच्या विचारात सरकार आहे. यासाठी पालकांशी चर्चा केली जात आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान दुसरा आणि तिसरा टप्पा हा कोरोनाबाधितांच्या आकड्यांवर अवलंबून आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान