औरंगाबाद शहरात SRPF चे 72 जवान कोरोनाबाधित, आज 90 रुग्णांचा उच्चांक, रुग्णसंख्या झाली 468

औरंगाबाद:-
औरंगाबाद शहरात SRPF चे 72 जवान कोरोनाबाधित, आज 90 पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 468 औरंगाबाद, 8 मे ( डि-24 न्यूज) SRPF चे 72 जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. हे जवान डेंजर झोन असलेल्या मालेगाव येथे दिड महीना ड्युटी करुन परतले होते. गुरुवारी त्यांच्यापैकी 19 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. यापूर्वी मालेगांवहून परतलेले हिंगोली आणि जालना येथील एसआरपिएफ जवान बाधित झाले होते. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून दोन महीन्यातील आज 90 पॉझिटिव्ह आलेली रुग्ण संख्या सर्वात मोठी आहे ही बाब शहराला चिंतेत टाकणारी आहे. 90 रुग्ण संख्या झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या 468 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. यामध्ये एसआरपीएफ कँम्प 72, बेगमपूरा 4, जयभिमनगर 4, बायजीपूरा 3, कटकटगेट 1, सिकंदर पार्क 1, शाहबाजार 1, भीमनगर, भावसिंगपूरा 1, ध्याननगर, गारखेडा 1, एन-2 लघु वदन कॉलनी 1, खुलताबाद 1 असे एकूण 90 रुग्णांचा अहवाल दुपारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान