NEET आणि IIT-JEE (Main) परीक्षेच्या तारीखा ठरल्या;
NEET आणि IIT-JEE (Main) परीक्षेच्या तारीखा ठरल्या;आता जुलै महिन्यात" होणार परीक्षा
नवी दिल्ली :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि IIT-JEE (Main)या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज मंगळवारी ५ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांसोबत एका वेबिनारचे आयोजन केलं होत. त्यांनी आज विद्यार्थ्यांशी टि्वटरवर लाइव्ह साधत NEET आणि IIT-JEE या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केली.
👉येत्या जुलै महिन्याच्या १८, २०, २१, २२ आणि २३ तारखांना IIT-JEE Main परीक्षा घेण्यात येणार आहे. तर IIT-JEE Advance परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
👉याचबरोबर NEETची परीक्षा २६ जुलैला घेण्यात येणार आहे. CBSE बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या रखडलेल्या परीक्षाबाबत लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.
👉दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा होती. अखेर NEET आणि IIT-JEE Main परीक्षेच्या तारखा ठरल्या असून या परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत.
Ufhx j36 koi
ReplyDelete6
5