वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी परिवहन महामंडळाकडून नांदेड विभागात नियंत्रण कक्ष स्थापन

वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी परिवहन महामंडळाकडून नांदेड विभागात नियंत्रण कक्ष स्थापन

नांदेड, दि. 8 :  लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून  यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
कोराना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून  शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.
तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.  या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा, असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

(कंसात भ्रमणध्वनी क्रमांक) कंसा बाहेर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक-
विभाग नियंत्रक अ. र. कचरे (8275038417) 02462-260175
विभागीय वाहतूक अधिकारी सं. बा. वाळवे- (9422185619) 02462-260621
 आगार प्रमुख (वरिष्ठ) नांदेड आगार पु. ता. व्यवहारे– (9070706024) 02462-234466
आगार प्रमुख भोकर सु. धु. पवार (8390168613) 02467-202633
आगार प्रमुख किनवट मि. पु. सोनाळे (9881391958) 02469-222050
आगार प्रमुख मुखेड सं. तु. शिंदे (9307786083) 02461-202547
आगार प्रमुख देगलूर अ. रा. चव्हाण (7588523782), 9422878417
आगार प्रमुख कंधार ह. म. ठाकुर (9823533890), 02466-223435
आगार प्रमुख हदगाव सं. बा. अकुलवार (9420461711) 02468-222344
आगार प्रमुख बिलोली च. र. समर्थवाड (8698094565), 02465-223323
आगार प्रमुख माहूर वि. तु. धुतमल (8668482504) 02460-268424

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान