बेटमोगरा येथे रमाई फाऊंडेशन व् डॉ.राहुल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमा साजरी

बेटमोगरा येथे बुद्ध पौर्णिमे निमीत्त रमाई फाऊंडेशन व डॉ.राहुल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने खीरदान व फळे वाटप. 

तथागत गौतम बुद्धांच्या अहिंसावादी व विज्ञानवादी विचारांद्वारेचं मानवजातीचं कल्याण शक्य - डॉ.राहुल कांबळे 

मुखेड/प्रतिनिधि 

आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या अहिंसावादी, समतावादी,विज्ञानवादी विचारांमध्ये आहे. आता जगला युद्धाची नाही तर बुद्ध विचारांची गरज आहे. श्री.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर शिवलिंग बादशहा मठ संस्थान बेटमोगरा, (मुखेड तालुक्यातील बेटमोगरा हे ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसा असलेले गाव आहे.)
 सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगा मध्ये कोरोना व्हायरस (कोविड-१९) या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून दि २२ मार्च च्या जनता कर्फ्यु नंतर देशात सर्वत्र लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) कायदा लागू करण्यात आला आहे. देशातील सद्यस्थिती ची जाणीव ठेवत संचार बंदी कायद्याचे काटेकोरपणे पालन करीत मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था व तालुक्यातील सुप्रसिद्ध पशुवैद्य तज्ञ डॉ.राहुल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ मे २०२० रोजी सायंकाळी चार वाजता येथील धम्मशील बुध्द विहारात फिजीकल डीस्टन्स चे तंतोतंत पालन करून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रमाई फाऊंडेशन बेटमोगरा चे अध्यक्ष प्रकाश दत्ता सोनकांबळे, संस्थेचे सचिव भारत सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून हा खीरदान व फळे वाटपाच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात जगाला शांतीचा संदेश देणारे, दुःख मुक्तीचे मार्गदाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमांना बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज व डॉ.राहुल कांबळे, खुशाल जी पाटील,ग्रा.पं.सदस्या लालिताबई सोनकांबळे,पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली."या कार्यक्रमा चे अध्यक्ष श्री.सिद्धदयाळ महाराज बेटमोगरेकर तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.राहुल कांबळे,मुखेड हे होते.मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली ६ वर्षापासून अविरतपणे सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक, सांस्कृतिक, लोककल्याणकारी उपक्रमाच्या माध्यमातून वयोवृद्ध व्यक्तींसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे., या प्रसंगी बोलताना डॉ. राहुल कांबळे म्हणाले,भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे तथागत बुद्धांचे अहिंसावादी व विज्ञानवादी विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील,अशा शब्दात आपले विचार मांडले. तसेच बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिद्धदयाळ महाराज यांनी विश्वशांतीचे उद्गाते, आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच् आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे, विश्ववंदनीय बोधिसत्व सम्यक संबुद्ध यांच्या जीवनकार्याला उजाळा देत बुद्ध पौर्णिमेनिमित त्यांच्या विज्ञानवादी व अहिंसेचा,दयेचा,करुणेचा, तसेच अत, दीप,भव, स्वयं दीप हो, हा जो संपूर्ण मानवजातीला संदेश दिला. आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील,असा विश्वासही यावेळी सिद्धदयाळ महाराज बेटमोगरेकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबई मालू सोनकांबळे, प्रल्हाद सोनकांबळे, निहाल शेख,बालाजी सोनकांबळे,दीपक सोनकांबळे,दिलीप सोनकांबळे,प्रकाश नवलेकर, राहुल सोनकांबळे, शंकर सोनकांबळे हर्षदीप सोनकांबळे,करुणा सोनकांबळे,कु.गंगासागर, आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन पत्रकार भारत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद सोनकांबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान