सावरगाव सरकरलचे जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य गायब

सावरगाव सरकरलचे जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य गायब

सावरगाव /प्रतिनिधी शेख चांदपाशा

वाढत्या covid19 चा प्रादुर्भाव व वाढता लॉकडाउन पाहता गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे , व त्यांना सहकार्याची गरज आहे, मात्र सावरगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,आपला मतदार संकटात सापडला असताना मात्र गायब झाले आहेत.
सावरगाव सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य, व दोन पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य सौ गंगासागर ताई सुगावे, व पंचायत समिती सदस्य व्यंकटराव दबडे, व केवळबाई पाटील सकनूरकर हे आहेत, लॉक डाउन झाल्यापासून एकदा ही आपल्या सर्कल मध्ये आले नाहीत असे गावकऱ्यांचे म्हणने आहे , त्यांचा मतदार संघ संकटात असून  सर्कल मधील गोरगरीब राजकिय पुढाऱ्यांची वाट पाहत आहेत की कोणीतरी आमची मदत करेल,कोरोनाच्या संकटात काम धंदा बंद असल्यामुळे हातावरचे पोट असलेल्या गोरगरीबांचे हाल होत आहे काम केलेतरच चूल पेटते असे मजुरदारावर उपास मारीची वेळ येवू लागली आहे , एक महिन्याच्या वर दुकाने बंद झालेली आहे, अशा परिस्थितीत दिग्गज नेते मात्र भेट द्यायला सुद्धा तयार नाहीत .परंतु काही सामाजिक कार्यकर्ते संस्था मदत करताना दिसत आहेत,
 आज घडीला जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना आपल्या मतदारांची काळजी आहे की नाही ?हा मोठा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे,यापुढे तरी सदस्यांनी आपल्या मतदार संघात जाऊन नगरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकातर्फे होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान