पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी

पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू;

राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी

पुण्यात आज सहायक पोलीस फौजदाराचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत चार पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

पुणे : कोरोना संसर्गामुळे आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भारती रुग्णालय धनकवडी येथे उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला. तर, आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान