माजी आमदार मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली गुजरात येथील कामगारांची परतीची सोय



माजी आमदार मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली गुजरात येथील कामगारांची परतीची सोय

 मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद 


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होते  की, राज्यातील कॉंग्रेस समिती गरजू कामगार आणि प्रवासी कामगारांसाठी रेल्वे भाड्याची जबाबदारी घेईल. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांना नेण्यासाठी भाडे घेऊ नये अशी अनेक वेळा केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली , परंतु आमचा मुद्दा ऐकला नव्हता.
 कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कणा आहेत, त्यांची मेहनत आणि त्याग हाच देशाचा आधार असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.1947 च्या फाळणीनंतर देशात प्रथमच अशा प्रकारचे संकट पाहिले आहे की शेकडो किलोमीटर चालून हजारो कामगारांना घरी परत जावे लागले. तथापि, त्यांच्याकडे पैसे, अन्न आणि औषध देखील नाही.‘संकटकाळी मजुरांकडून भाडे वसूल करणे चुकीचे’ सोनिया मन्हाल्या होत्या
अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे भाडे घेतले जात नाही, तर मग अशी  विनम्रता  प्रवासी मजुरांना का दाखवता येणार नाही, असा प्रश्न सोनिया यांनी सरकारला  केला होता . सोनिया मन्हाल्या  की गुजरातमधील एका कार्यक्रमात आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून  100 कोटी रुपये परिवहन व अन्नावर खर्च करू शकतो, तर रेल्वे मंत्रालय पंतप्रधान कोरोना फंडामध्ये 151 कोटी रुपये देऊ शकते, मग प्रवाशांना मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा का? देऊ शकत नाही? संकटाच्या वेळी रेल्वे प्रवाशांकडून भाडे आकारत आहे हे खेद जनक आहे.

मा.सोनीया गांधी यांच्या घोषणेला अनुसरुन मुखेड शहरात कोरोनामुळे अडकुन पडलेल्या परप्रांतीय लोकांची परतीची सोय कांग्रेस पक्षाच्या वतीने
मा.सोनीया गांधी यांच्या घोषणेला अनुसरुन पालक मंत्री *ना.अशोकराव चव्हाण
   साहेबांच्या सुचनेनुसार
मा.तहसीलदार साहेबांकडे नोंद असलेल्या ३० गुजरात व मध्यप्रदेशाच्या लोकांची सोय माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी स्वखर्चातुन ट्रॅव्हल्सद्वारे औरंगाबाद पर्यंत व तेथून पुढे रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था केली.
आज स.आठ वा.त्या सर्व कामगांरांना सॅनीटाईज केलेल्या गाडीद्वारे रवाना करण्यात आले.त्यांच्या अल्पोपहाराचीही सोय केलेली होती.
आवशक त्या परवाना पत्रासह निरोप देतांना मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,
मा.तहसीलदार काशीनाथ पाटील,मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे,जि.प.स.प्र.संतोष बोनलेवाड,कांग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे,ता.ऊपा.ऊत्तमअण्णा चौधरी,कार्याध्यक्ष डाॅ.रणजीत काळे,सरचिटणिस मारोती घाटे,विशाल गायकवाड.हफिजखान पठाण ऊपस्थीत होते.













Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान