रमजानचा रोजा असुनही कडक उन्हात कर्तव्य निभावणारे कोरोना यौद्धा PSI असद शेख

सोशल मिडीयावर ईफ्तार करतानाची फोटो व्हायरल
मुखेड /प्रतिनिधी
नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक असद शेख यांचा ईफ्तार करतानाचा फोटो समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचा कारण म्हणजे सद्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. 45 डिग्री तापमानातही उपवास (रोजा) असुन सुध्दा हाॅट स्पाॅट बनलेल्या नांदेडच्या रस्त्यावर कडक उन्हात कर्तव्य निभावणाऱ्या पिएसआय असद शेख ची कोरोना यौद्धा म्हणून जोरदार चर्चा होत आहे.
कोव्हीड १९ - कोरोनाने देशात हल्ला केल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी दिवस रात्र सरकारी अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. नागरिकांना घरात बसून कोरोना विरोधात लढायचे असून तसा काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना नाईलाजाने त्यांना शिक्षा करावी लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, महसूल व पोलिस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. याच बरोबर कर्तव्यासोबत धर्म असाच एक आदर्श घालणारा अनुभव नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षकाकडून पहायला मिळाला. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुना मोंढा पुल, मार्गावर बंदोबस्तावर असणारे असद शेख हे उपवास असुन सुध्दा कर्तव्यदक्षपणा दाखवत कर्तव्याला प्राधान्य देत भर उन्हात आपले कर्तव्य निभावत आहेत. एका खासगी पोर्टल न्युज वाल्यांनी असद शेख यांची ईफ्तार करतानाची फोटो व चित्रफित सोशल मिडीयावर टाकली. यास अनेकांनी पसंती दर्शवत शेअर केली. पिएसआय असद शेख हे मुखेड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अवैध दारू विक्रेते, गुटखा माफिया, रेती माफिया, रोडरोमीओ, खंडणी बहाद्दरांवर कडक कारवाई करत सामान्य मुखेडकरांच्या मनात आपली जागा निर्माण केलेली आहे. शेख यांची फोटो सोशल मिडीयावर पाहताच त्यांच्या दबंग कारवाईची मुखेडकरांना आठवण झाली. तसेच कडक उन्हात कर्तव्यासह धर्माचे आचरण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

I appreciate your efforts for national interest,sir All the best
ReplyDelete