विधानपरिषद ! राष्ट्रवादीत ‘रस्सीखेच’, ‘महाविकास’मधील ‘ही’ नावं स्पर्धेत

विधानपरिषद ! राष्ट्रवादीत ‘रस्सीखेच’, ‘महाविकास’मधील ‘ही’ नावं स्पर्धेत

 राजकीय अस्थिरतेच्या चर्चेनंतर राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काही नावांवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. तर शिवसेनेकडून या आधीच दोन नावे निश्चित झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नावाचा समावेश आहे.

राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत. राष्ट्रवादीत सिु्प्रया सुळे त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्ली हायकमांड यांच्याशी त्यांच्या पक्षातील अंतिम नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात केवळ एक जागा पडत असल्याने इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यात एकाच उमेदवाराला संधी देताना प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान