नांदेडमधील कोरोनाचा चौथा बळी अबचलनगरतील पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू !
आणखी एक नव्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू ! नांदेडमधील कोरोनाचा चौथा बळी प्रतिनिधि:- बल्खी आसद
नांदेड :- दिनांक 6 मे रोजी 32 अहवाल प्रलंबित होते, परंतु आता प्राप्त 23 अहवाला नुसार 22 संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव प्राप्त झाले असून अबचलनगर नांदेड येथील रहिवासी पुरूष रूग्णांचा वय 56 वर्ष अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. सदर रुग्णास एन आर राय यात्री निवास येथे 3 मे पासून अलगीकरण कक्षात दाखल करण्यात येऊन दिनांक 3 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असता त्या अहवालाचा निष्कर्ष निघाला नाही.
परंतु सदर व्यक्तीस आज दिनांक 6 मे रोजी सकाळी 08.30 ते 9 चा दरम्यान अति गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आले असता तात्काळ सर्वउपचार करूनही संबंधित रुग्नाद्वारे औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे त्यास तात्काळ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे संदर्भित केले असता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सदर रुग्णा मृत पावला.
सदर रुग्णांस अतीउच्च रक्तदाब तसेच हृदयरोगाचा त्रास असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर रुग्णाचा आज सकाळी स्वॅब तपासासाठी घेतला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. जनतेने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .
अबचलनगर येथील ५६ वर्षीय व्यक्ती नवीन कोरोना बाधित, ३२ पैकी २३ अहवाल प्राप्त २२ अहवाल निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह
Comments
Post a Comment