"कोरोना योद्धानां" नंदकुमार मडगुलवार यांच्याकडून कोरोना प्रोटेक्शन फायबर मास्क वाटप

"कोरोना योद्धानां" कॉंग्रेस शहर अध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्याकडून कोरोना प्रोटेक्शन फायबर मास्क वाटप. 

मुखेड/प्रतिनिधि बल्खी आसद

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी डॉक्टर्स,पोलीस अधिकारी,नपा प्रशासन हे जीवापाड मेहनत घेत आहेत, यांना कुठलिही बाधा होवू नये म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मडगुलवार यांनी मोफत प्लास्टिक मास्क वाटप केले आहेत,त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या महारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅकडाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे. दिवसें दिवस पोलीस व डॉक्टरांना सुध्दा कोरोनाची लागणचा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा जनसंपर्क जास्त असतो त्यामुळे त्यांना प्रादूर्भावाची शक्यता जास्त  असते त्यामुळे त्यापासून बचाव व्हावा या उदेशाने  असे मास्क पुरविण्याची कल्पना नंदकुमार मडगुलवार यांनी राबविली आहे. 
मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पिएसआय मगरे व वैद्यकीय अधिका-यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार,दिलीप कोडगिरे,शरद कोडगिरे यांच्या हस्ते देण्यात आले.याअगोदर ही नंदकुमार मडगुलवार यांनी नगर पालिकेला फवारणी मशीन दिली आहे तसेच शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सँनिटायझर करण्यासाठी मशीन उभ्या केल्या आहेत, गोरगरीबांना धान्याचे किट वाटप केले आहेत तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने न्हावी समाजातील गरिब व गरजूंना किटचे वाटप करण्यात आले आहे. 
या वेळी  नंदकुमार मडगुलवार,दिलीप कोडगीरे,विशाल गायकवाड,शौकत होनवडजकर,मारोती घाटे,जयप्रकाश कांनगूले उपस्तित होते अशा संकटसमयी धावून येत असल्याने तहसीलदार काशीनाथ पाटीलसाहेब  ,मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे साहेब ,मुखेड पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर,पिएसआय मगरे यांच्याकडुन नंदकुमार मडगुलवार यांचे अभिनंदन करण्यात आले .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान