हिंगोलीत आणखी १४ जवानांना कोरोना संख्या ८९ वर


- बाधीतांची संख्या ८९ वर
- २४ तासात ३६ जवान पॉझिटिव्ह
- एकूण ८३ जवानांना कोरोनाची लागण



नांदेड:- हिंगोलीमधील राज्य राखीव दलातील कोरोनाचा संसर्ग होत असलेल्या जवानांची संख्या वाढत असून मंगळवार दि. 5 मे रोजी 14 जवाना कोरोनाबधित झाले आहेत. तर सोमवारच्या रात्री 22 जवाना कोरोना पॉझिटीव्ह निघाले, असून मागच्या 12 ते 14 तासांमध्ये 37 जण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. यामध्ये 36 जवान व एका परिचारिकेचा समावेश आहे. आतापर्यंत आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात ८९ पैकी ८३ जण हे राज्य राखीव दलाचे जवान आहेत.

हिंगोली जिल्ह्यात दि. 4 रोजी रात्री उशिराला आलेल्या अहवालानुसार एसआरपीएफ च्या 22 तर एक परिचारिकेस कोरोनाची लागण झाली. तर मंगळवारी 14 जवानांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हयातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती. यातील 83 जवांनापैकी 35 जवान हे मालेगाव (नाशिक) तर मुंबई येथे 48 जवान कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे. यातील एक जणाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान