ती कोरोनाग्रस्त महिला देगलूरनाका रहमतनगर भागातील !

नांदेड : पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोणामुळे कोरोनाची लागण झाली, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. असे असतांना देगलूरनाका भागातील रहमतनगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' होणार आहे. रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते असे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी त्या महिलेचे स्वाब घेतले असता त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान स्वब चाचणीच्या अहवालात खाजगी रुग्णालय,नांदेड असा उल्लेख असल्याने संबंधित महिला नेमक्या कुठल्या भागातील रहिवासी आहे, असा प्रश्न सुरुवातीला प्रशासनाला पडला होता. शेवटी शोधाशोध केल्यानंतर ती महिला रहमतनगर भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. दुसरीकडे ती कोरोनाबाधित महिला सुरुवातीला डॉक्टर लेन भागातील ज्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. रहमतनगर भागातील त्या महिलेचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर हा संपूर्ण भाग सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. कोरोना वायरसने हातपाय पसरवले! गेल्या दोन दिवसात नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा ग्राफ वाढत चालल्याचे दिसून येते.शनिवारी गुरुद्वारा लंगरसाहिब परिसरात कार्यरत २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण असताना रविवारी कोरोना रुग्णाच्या संख्येत तीनने वाढ झाली. यापैकी दोन जण हे यात्रेकरूंना पंजाबला सोडून आलेले वाहनचालक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोना वायरसने शहरात हातपाय पसरवणे सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment